खंड १ ला: १७. अन्नाचे प्रयोग
खंड १ ला: १७. अन्नाचे प्रयोग - मूळ पुस्तक: #सत्याचे #प्रयोग #अथवा #आत्मकथा - लेखक: #मोहनदास #करमचंद #गांधी - अनुवादक : सीताराम पुरुषोत्तम पटवर्धन - नवजीवन प्रकाशन मंदिर, अहमदाबाद-१४ - चौथी आवृत्ती ( १४.०३.१९६९) - पान नं. ५३-५६ - सोशल मीडिया टायपिंग : सकीना वागदरीकर/ सखी जयचंदर -आत्तापर्यंतचे सर्व भाग एकत्रित वाचण्यासाठी लिंक: https://sakhi-sajani.blogspot.com ************************************ जीवनाविषयी मी जो जो बारकाईने विचार करू लागलो, तो तो मला माझ्या अंतर्बाह्य आचारात फरक करण्याची जरुरी भासू लागली. ज्या वेगाने राहणी व खर्च यामध्ये फेरफार केला, त्याच, किंबहुना त्याहून अधिक वेगाने मी माझ्या आहारामध्ये फेरफार करू लागलो. अन्नाहारावरील इंग्रजी पुस्तकांमध्ये लेखकांनी फार सूक्ष्म विचार केल्याचे मला दिसून आले. अन्नाहाराचा त्यांनी धर्म, विज्ञान, व्यवहार व आरोग्य यांच्या दृष्टीने विचार केला होता. नैतिकदृष्ट्या त्यांचे म्हणणे असे होते, की माणसाला पशुपक्ष्यांदिकांवर जे प्रभुत्व मिळालेले आहे, ते त्यांना मारून खाण्यासाठी नव्हे, तर त्यांच्या रक्षणासाठी; किंवा ज्याप्रमाणे मनुष्ये