Posts

Showing posts from May, 2020

आज्जी आजोबांची डायरी: भाग २७

मागच्या आठवड्यात सिनियर केअर होमकडे जातांना लॉकडाऊन शिथिल केला गेला असल्याचं अचानकपणे जाणवलं.. करोनामुळे सुरू झालेल्या लॉकडाऊनमुळे एरव्ही शुकशुकाट असणाऱ्या जर्मनीच्या हॅनोवर शहरातील रस्त्यांवर आणि पब्लिक ट्रान्सपोर्टमध्येही लोकांची गर्दी आता पुन्हा दिसायला लागलेली आहे. लॉन असलेले गार्डन्स खुले झालेले असले तरी एकेका कुटुंबातील लहान मुलंच एकत्र खेळतांना दिसत आहेत. पब्लिक स्विमिंग पूल्स मात्र अजूनही बंदच आहेत. दरवर्षी ह्या स्विमिंगपुल्सवर तोबा गर्दी असते. पाय ठेवायला जागा नसते, इतके लोक तिथे येत असतात. जर्मनीत उन्हाळ्याची चाहूल लागताच लोक आऊटडोअर ऍक्टिव्हिटीजसाठी घराबाहेर पडतांना दिसतात. गार्डन्सच्या लॉन्सवर वाचत पडणे, पोहणे, जॉगिंग, खेळ, सायकल राईड, माउंटन क्लाइंबिंग, फॉरेस्ट वॉक, नॉर्डीक वॉक(दोन्ही हातांमध्ये स्टिक्स घेऊन चालणं) असं काही ना काही सुरू करतात. उन्हाचा पुरेपूर आस्वाद घेतात. हे सगळं लोक ह्या वर्षी लोक मोकळेपणाने करू शकतील की नाही?, हा उन्हाळा आऊटडोअर ऍक्टिव्हिटीजशिवायच संपून जाईल की काय? हा विचार मनात असतांनाच शिथिल केलेल्या लॉकडाऊनमुळे आशा पुन्हा पल्लवित झालेल्या आहेत

आज्जी-आजोबांची डायरी: भाग २६

दोन आठवड्यापूर्वीची गोष्ट आहे. क्वारंटाईन फ्लोअरवर ड्युटी असल्याने बाकी कोणत्याही फ्लोअरवर जाण्याची गेले काही दिवस मला संधी मिळालेली नव्हती. ती मागच्या आठवड्यात चालून आली. एका केअर एम्प्लॉयी(स्पेशालाईज्ड नर्स) ने मला कॉल केला आणि सांगितले की एक आज्जी हॉस्पिटलमधून परत आलेल्या आहेत आणि त्यांना त्यांच्याच रूममध्ये क्वारंटाईन करण्यात आले आहे. (जे आज्जी आजोबा स्वतःहुन रूमबाहेर पडत नाहीत, त्यांना त्यांच्याच रूममध्ये आयसोलेट केले जाते.) ह्या आज्जी सारख्या रडत आहेत आणि त्यांची जगण्याची उमेद नष्ट झालेली आहे. तू त्यांना भेटशील का? मी अर्थातच होकार दिला. ह्या आज्जींना मी आधीही एकदा भेटलेले होते. तेंव्हाही अशीच कोणाच्यातरी सांगण्यावरूनच.. त्यांना तेंव्हाही असाच डिप्रेशनचा ऍटॅक आलेला होता. मी त्यांना पहिल्यांदा भेटले, तेंव्हा गप्पांच्या ओघात समजलं की त्यांनी लाईफ बुक लिहिलेलं आहे. मला त्यांनी ते उत्साहाने दाखवलं. ते हस्तलिखित पुस्तक त्यांच्या नातसुनेने टाईप करून, त्याच्या अनेक प्रिंट्स काढून, स्पायरल बाईंडीग करून कुटुंबातील सर्वांना त्याच्या कॉपीज वाटल्या असल्याची माहिती आज्जींनी मला दिली. त्या

आज्जी-आजोबांची डायरी: भाग २५

सिनियर केअर होममधल्या माझ्या क्वारंटाईन फ्लोअरवरच्या ड्युटीमध्ये गेल्या आठवड्यापासून बरंच काही घडलं आहे.. बराच हॅपनिंग आहे हा फ्लोअर एकंदरीत.. मला सुरुवातीला अजिबात वाटलं नव्हतं की चार पाच आज्जी आजोबांना रोज भेटणे, हे इंटरेस्टिंग काम असेल. उलट मला वाटत होतं की वेळ खायला उठेल की काय, त्यांना मला रोज रोज बघून बोअर होईल की काय.. पण सुदैवाने झालंय उलटंच. त्या सतत नर्व्हस राहणाऱ्या आज्जींना थोडक्यात भेटून आणि दिलासा देऊन घरी आले, त्यानंतर दुसऱ्या दिवशी परत कामावर गेले, तर त्या अजूनही नर्व्हस स्थितीतच होत्या. एकतर त्यांच्यासाठी संस्थाही नवीन आणि वरून हे असलं आयसोलेशन, त्यामुळे त्यांची तब्येत अजूनच बिघडलेली. त्यांच्या रूममध्ये माझ्या सांगण्यावरून तातडीने रेडिओ पाठवलेला होता टेक्निशियनने, पण तो ऐकण्याच्या मनस्थितीतही त्या नव्हत्या. वाचायला दिलेलं वर्तमानपत्रही तसंच पडलेलं होतं टेबलवर. आता आज्जींचा नर्व्हसनेस वेगळ्या कारणावरून सुरू झालेला होता. त्यांच्या लेकीने त्यांना एक बेसिक मॉडेलचा फोन दिलेला होता, त्यात सगळे कॉन्टॅक्टस सेव्ह केलेले होते, पण त्यांना कळत नव्हतं की कॉल करायचा कसा? त्या

आज्जी-आजोबांची डायरी: भाग २४

बॅक टू मागचा आठवडा.. सिनियर केअर होममध्ये नवीन दाखल झालेल्या एका आज्जींना आता नंतर भेटू, हे सांगून घरी जायला निघाले, तर नर्सने आजच भेट असे सांगितले. त्या भेटीचे कारण, त्या फार घाबरलेल्या आहेत. त्यांच्या मुलीला करोना होईल का? ती जॉब करते, तिचा ह्या आजाराने इन्फेक्शन होऊन, जॉब जाईल का, या भीतीने त्यांना झोप लागत नव्हती. मग तडक त्यांना भेटायला गेले. ओळख करून घेऊन मोकळी हवा खायला गच्चीवर घेऊन गेले. 'घाबरू नका. नकारात्मक विचार करू नका. तुमच्या मुलीला काहीही होणार नाही, तुम्ही निश्चीन्त रहा, रिलॅक्स रहा. टीव्ही बघा, रेडिओ ऐकत झोपा, पेपर वाचण्यात मन गुंतवा', असे सांगितले. 'टीव्ही नको वाटतो. पेपर माझ्याकडे नाही आणि रेडिओही नाही', सांगितल्यावर चष्मेवाल्या आज्जींना ह्या नवीन आज्जींना 'तुमचा जुना पेपर देऊ का वाचायला?', विचारल्यावर, 'जुना कशाला, नवीन दे ना', म्हणाल्या. मी 'नको, तुम्ही नवीन वाचा आणि जुनाही उद्या आणून देते', सांगितल्यावर, 'काही घाई नाही. सावकाश वाचू दे', असे सांगून मोठ्या मनाने पेपर घेऊन जायला परवानगी दिली. आज्जींशी गप्पा मारण्या

आज्जी-आजोबांची डायरी: भाग २३

आज माझ्या बाबांचा वाढदिवस असल्याने आणि मी अशाप्रकारच्या सामाजिक कामाचा भाग होण्यामागे त्यांची खूप मोठी प्रेरणा असल्याने डायरीचा आजचा भाग बाबांना समर्पित आणि त्यानिमित्ताने बाबांच्या स्वभावाचे काही पैलू सांगायला मला आवडतील.. सर्वप्रथम बाबांना ७२व्या वाढदिवसानिमित्त अनेक हार्दिक शुभेच्छा.  बाबांनी माझ्या लहानपणापासूनच मला वाचनाची गोडी निर्माण करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं मला आणून दिली. पण माझ्यावर सगळ्यात जास्त परिणाम करणारी पुस्तकं बाबांनी आणली ती सकाळ वृत्तपत्र समूहाचे माजी संपादक उत्तम कांबळे, म्हणजेच ज्यांची मी मानसकन्या आहे, त्या कांबळे काकांच्या सांगण्यावरून.  'डायरी ऑफ ऍन फ्रँक' हे पुस्तक मला माझ्या चौदाव्या वाढदिवशी बक्षीस मिळालं. ज्यू कुटूंबाचा भाग असलेली ऍन वंशवादी हिटलरच्या विळख्यातुन निसटण्यासाठी दोन वर्षाइतक्या दीर्घ काळ आपल्या वडिलांच्या ऍमस्टरडॅम येथील ऑफिसच्या एका मजल्यावर आपल्या कुटुंबासहित लपून बसलेली होती, त्यांच्यासोबत अजूनही काही कुटुंबे होती. ह्या काळात तिला आपल्या बाराव्या वाढदिवशी मिळालेल्या डायरीत तिने आपल्या दैनंदिन आयुष्याची नोंद करायला सुरुवा

आज्जी-आजोबांची डायरी: भाग २२

सिनिअर केअर होममधल्या चष्मेवाल्या आज्जींना भेटून आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून खरंतर मी माझ्यावर सोपवलेल्या गार्डन ड्यूटीवर जायला हवे होते, मोकळी हवा, छान कडक पण बोचरे नसणाऱ्या उन्हाचा आस्वाद घेत आनंदी आणि हेल्दी आज्जी आजोबांसोबत गप्पा मारायला खाली गार्डनमध्ये असायला हवे होते, पण कुणास ठाऊक का, माझी पावलं नेहमी स्वतःच्या विश्वात हरवलेल्या एका आज्जींच्या रूमकडे वळली. रूममध्ये जाण्यापूर्वी प्रोटोकॉलनुसार वरच्या लेअरवरचे ग्लोव्हज कचऱ्यात फेकून दुसरे घातले. त्या आज्जीं डोळे मिटून पडलेल्याच होत्या. त्यांना सांगितलं की वास्तविक माझी दुपारची ड्यूटी गार्डनमध्ये असते पण त्या दुसऱ्या आज्जींना चष्मा द्यायला आले, तर तुम्हालाही जाता जाता भेटायला आले. ते ऐकताच आज्जींनी माझा डबल ग्लोव्हज घातलेला हात हातात घेतला आणि अतिशय घट्ट पकडला. मग दुसरा हातही माझ्या हातावर धरला आणि एकदम गाढ झोपी गेल्या. मी उभीच होते. वाकून उभ्या अवस्थेत तीन चार मिनिटं तशीच अवघडलेल्या अवस्थेत थांबल्यानंतर हळूच माझा हात सोडवून घेऊन जायला निघाले, तर आज्जी उठल्या आणि म्हणाल्या नको जाऊस गं.. बरं वाटतंय मला कोणीतरी सोबत आ

आज्जी-आजोबांची डायरी: भाग २१

आयसोलेटेड फ्लोअरवरच्या मूळच्या टेलर असलेल्या ८५ वर्षांच्या आज्जींसोबत एका तासाच्यावर वेळ घालवल्यानंतर मी दुसऱ्या आज्जींना भेटायला गेले. ह्या आज्जींना सोमवारी थोडक्यात भेटले, त्याआधीही मी एकदा भेटलेले होते, पण ते त्यांच्या खोलीत खालच्या मजल्यावर.. तेंव्हा त्या आयसोलेटेड नव्हत्या. त्यांच्या रूममध्ये घरून आणलेले छान फर्निचर होते. गप्पांच्या ओघात त्यांनी स्वतःविषयी बरीच माहीती त्यावेळी दिलेली होती. त्यांनी सुईण म्हणून आणि नर्स म्हणूनही अनेक वर्षे हॉस्पिटलमध्ये काम केलेले होते. त्यांच्या त्या रूममध्ये गप्पा मारतांना त्या एकदम फ्रेश होत्या. पण आता ह्या आयसोलेटेड फ्लोअरवर मात्र त्या डल वाटत होत्या. सोमवारी भेटले, तेंव्हा कळले की त्यांच्या चष्म्याची काडी तुटलेली आहे. तो चष्मा वाचण्यासाठीचा असल्याने त्यांना टीव्ही बघणे, पेपर वाचणे, या सगळ्यावर बंधनं आलेली आहेत. त्यांना त्यामुळे अतिशय कंटाळा आलेला आहे. मी कधी माझ्या मूळ खोलीत परत जाईन, असं त्या मला विचारत होत्या. फक्त चौदा दिवसांचा प्रश्न असल्याने ह्या खोलीत त्यांचे काहीच फर्निचर शिफ्ट केलेले नव्हते. फक्त बेसिक गोष्टी होत्या. जसे बेड, बेडशे

आज्जी-आजोबांची डायरी: भाग २०

सिनियर केअर होममधल्या माझ्या नोकरीचे स्वरूप ह्या सोमवारपासून बदलेले, हे मागच्या भागात लिहिले आहेच. तर त्यानुसार क्वारंटाईन केल्या गेलेल्या आज्जी आजोबांना वेगळ्या मजल्यावर ठेवले गेलेले असून आता त्यांच्यासोबत क्वालिटी टाईम घालवणं ही अर्ध्या दिवसाची माझी ड्युटी ठरवली गेली असून लंचब्रेकनंतर गार्डनमधल्या आज्जी आजोबांसोबत बोलणे असे माझे काम ठरले. सोमवारच्या कामाबद्दल मागच्या भागात लिहिले आहेच. मंगळवारी कामावर गेल्या गेल्या आधी आज्जी आजोबांसोबत कोणते खेळ खेळायचे, त्यांना काय आवडते, ते समजून घ्यायला जर्मन कलिग्जना भेटले. त्या संवादामधून समजले की बहुतेक सगळ्यांचा आवडता खेळ आहे "मेन्श एर्गेर्न दिश निष्त" म्हणजे "लोक तुम्हाला त्रास देत नाहीत/ चिडीला आणत नाहीत".. असं मजेशीर नाव असलेला खेळ नक्की कसा असेल, हे बघण्याची मला उत्सुकता निर्माण झाली. एक ऑक्युपेशनल थेरपिस्ट मला क्रिएटिव्ह रूममध्ये घेऊन गेली. तिने हा खेळ मला दाखवला असता एक लाकडी बोर्ड, त्यात चार बाजूंना प्रत्येकी चार वेगवेगळ्या रंगांच्या सोंगट्या आणि एक फासा हे सगळं त्यात होतं. फासा टाकून जो आकडा येईल, त्यानुसार

आज्जी-आजोबांची डायरी: भाग १९

सिनियर केअर होममधल्या जॉबची माझी एक आठवड्याची रजा अजून एक आठवडा वाढली आणि त्यामुळे घरी असल्याने डायरी लिहिली गेली नाही. आज दोन आठवड्यांनी पुन्हा कामावर जाणे सहाजिकच जीवावर आलेले होते. मात्र आज्जी आजोबांना भेटण्याचीही उत्सुकता होतीच. आजपासून लॉकडाउनची बंधनं रिलॅक्स केलेली असल्याने रस्त्यावर आणि ट्रॅममध्येही थोडे जास्त लोक दिसले.  कामावर गेल्या गेल्या ऍडमीन कलीगने सांगितले, "बॉसना तुझ्याशी बोलायचे आहे, तर राऊंडला जाण्याआधी त्यांना जाऊन भेट." त्यांना भेटल्यावर समजलं की आजपासून माझ्या कामाचं स्वरूप बदललं आहे. आजपासून मला सगळ्यात वरच्या मजल्यावर क्वारंटाईनमध्ये ठेवल्या गेलेल्या रहिवाश्यांजवळ अर्धा दिवस आणि लंच ब्रेकनंतर उरलेला दिवस गार्डनमध्ये फेऱ्या मारण्यासाठी, मोकळी हवा खाण्यासाठी आलेल्या आज्जी आजोबांना भेटायचे आणि त्यांच्यासोबत बोलायचे आहे आणि अर्थातच सगळे डॉक्युमेंटेशन करून मगच दिवसाचे काम पूर्ण करायचे आहे. थोडक्यात, क्वारंटाईन केलेल्या मजल्यावर जाऊन आल्यानंतर आता बाकीच्या ३ मजल्यांवर जाणे सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य नसल्याने सुरक्षित अंतरावर थांबून मी गार्डनमध्ये