Posts

आमची लंडन ट्रिप

आमची लंडन ट्रिप शनिवार दि. 16 मार्च ते बुधवार दि. 20 मार्च असे प्रवास धरून एकूण पाच दिवसांची लंडन ट्रिप आम्ही केली. खूप दिवसांपासून मनात असलेली ही ट्रिप फायनली प्रत्यक्षात करता आली. भारतात राहत असतांना इंग्रजी ही आंतरराष्ट्रीय भाषा आहे, हे ऐकतच मोठे झालेलो असतो आपण. मात्र युरोपियन देशांमध्ये आलो की हा समज साफ खोटा ठरावा, असे अनुभव येतात, जे अर्थातच मलाही आले. जर्मनीत राहायला लागले आणि इथे इंग्रजी चालत नाही, हे कळले. इतरही युरोपियन देशांमध्ये कमी अधिक प्रमाणात हीच परिस्थिती असल्याचं लक्षात आलं. इंग्रजी येत असूनही समोरच्याला त्यांची भाषा बोलायला प्रवृत्त करून त्यांच्या भाषेचं जतन करण्याचं महत्वाचं काम हे देश करतात. त्यांचं म्हणणं असतं की इंग्लिश लोक शिकतात का तुमची भाषा? ते तुम्हालाच इंग्रजी शिकून बोलायला लावतात ना? मग आम्हीही तेच करतो! ह्या पार्श्वभूमीवर लंडन ट्रिप करायचं ठरवलं आणि सगळ्यात पहिली गोष्ट मनात आली, ती म्हणजे जिथे आपल्याला व्यवस्थित समजते, बोलता येते, ती भाषा असलेल्या देशात आपण जात आहोत आणि या गोष्टीचे प्रचंड थ्रील मनात होते. शिवाय ज्या ब्रिटिशांनी आपल्यावर राज्य केले, त्य

आज्जी आजोबांची डायरी: भाग ५०

  डायरीच्या मागच्या भागात स्वतःच्या पायाच्या बोटाला इजा करून घेणाऱ्या ज्या आजोबांविषयी लिहिले, ते आजोबा अजूनही हॉस्पिटलमध्येच आहेत. त्यांचे काही अपडेट्स समजले नाहीत. पण आज काही आठवड्यांनंतर हॉस्पिटलमधून परतलेल्या आजोबांना भेटले आणि त्यांची गोष्ट आज लिहायलाच हवी, असं मनात आलं म्हणून काम संपल्याबरोबर लगेच लिहितेय. काही महिन्यांपूर्वी एकत्रच आमच्या सिनिअर केअर होममध्ये जोडीनेच हे आज्जी आजोबा दाखल झाले.  ९३ वर्षं वयाच्या आज्जी बेड रिडन आणि विस्मरणाचा आजार जडलेल्या तर आजोबा आज्जींपेक्षा २ वर्षांनी मोठे पण अजूनही बऱ्यापैकी फिटनेस असलेले.. कसल्याही आधाराशिवाय चालू फिरू शकणारे आणि आपली सगळी कामं स्वावलंबीपणे करू शकणारे असे. "मी केवळ माझ्या बायकोसाठी इथे दाखल झालो आहे. ६७(की असाच काहीतरी आकडा) वर्षांचा आमचा संसार. कायम एकत्रच राहिलोय तर आता या टप्प्यावर तिला सोडून राहू शकत नाही, म्हणून इकडे दाखल झालो." असं कारण त्यांनी मला सांगितलं. आज्जी विशेष काही बोलू शकत नव्हत्या, पण आमचं बोलणं त्यांच्यापर्यंत पोहोतच होतं आणि त्यांना समजतही होतं, असं त्यांच्या एकंदरीत हावभावावरून मला जाणवलं. आज

आज्जी आजोबांची डायरी: भाग ४९

एका वर्षाच्या वर झालं मला डायरी लिहून. आज एका मैत्रिणीने आठवण काढली डायरीची आणि परत लिहायला घेतलं. ज्यांनी माझी डायरी वाचलेली नाहीये त्यांच्यासाठी माहिती. मी जर्मनीत एका सिनिअर केअर नर्सिंगहोममध्ये सायकॉलॉजीस्ट म्हणून गेली साडेतीन वर्षं काम करते आहे आणि तेथील अनुभवांवर डायरी लिहिते आहे.  रोज इतके अनुभव येतात की किती लिहू, काय लिहू, कुठून सुरुवात करू असे झाले आहे. तर मग आजच्या दिवसाबद्दलच लिहावे म्हणते! आजचा दिवस तसा युनिकच गेला म्हणायला हवं. एका भागात एका आजोबांविषयी लिहिलं होतं की ते बायको आयसोलेटेड विभागात असल्याने तिचा विरह सहन न झाल्याने त्यांनी हाताची नस कापून घेतली होती. त्या गोष्टीला आता एका वर्षापेक्षा जास्त झालंय.  त्यानंतर त्या आज्जी परत आजोबांच्या रूममध्ये परत आल्या आणि नंतर आजारपणात एक दिवस वारल्या. रात्रीची वेळ होती, त्या गेल्या तेंव्हा. ती पूर्ण रात्र पूर्णवेळ आजोबा आज्जींजवळ बसून होते. दुसऱ्या दिवशी दुपारी फ्युनरल सर्व्हिसचे लोक आज्जींना घेऊन गेले, त्या वेळपर्यंत ते आज्जींसोबत बसून होते. त्यांनी आज्जींच्या हातात एक फुलही ठेवलं होतं.  आज्जी आयसोलेटेड होत्या, त्यावेळी विरह

Harz Trip

जर्मनीतील हॅनोवर शहरापासून साधारण ९० किमी अंतरावर असलेल्या Harz ह्या ठिकाणाविषयी बरंच ऐकलं होतं, पण ते पाहण्याचा योग मात्र ह्या इस्टरनिमित्त मिळालेल्या लॉंग विकेंडला आला. ह्या युनिक ट्रिपचे अनुभव लिहून काढावे, असं मनात होतंच, पण बाबांनी लिहायला सांगितल्यावर तो विचार मनात पक्का झाला.  ट्रीपला जाऊन आता एक आठवडा पूर्ण होईल, मग जसजसा वेळ जातो, तसतशा आठवणीही पुसट होत जातात. मात्र दिवस सुरू झाला की ऑफिस आणि घरकामात वेळ जातो आणि रात्री दमून झोप लागते, या सगळ्यात लिहायला वेळ कसा काढायचा , हेच समजत नव्हतं. आज मात्र मध्यरात्री जाग आली ती लिहिण्याची उर्मी येऊनच. उठ आणि लिही असं एक मन मला सांगत होतं चक्क! तर दुसरं म्हणत होतं, उद्या सकाळी लवकर उठून कामावर जायचं आहे. आत्ता जागलीस तर दिवस थकव्यात जाईल. ह्या द्वंद्वात अर्धातास पडून राहिले. शेवटी पहिल्या मनाचं ऐकायचं ठरवलं आणि उठलेच! असो, तर नमनाला घडाभर तेल ओतून झालं आहे, तेंव्हा मूळ मुद्दा सुरू करते. ह्या इस्टरच्या सुट्टीत आपण नक्की जायचं कुठे, नक्की जायचं कुठेतरी की जरा घर वगैरे नीटनेटकं आवरत भरपूर आराम करायचा, नेटफ्लिक्स सिरीज बिंज वॉज करायच्या,

आज्जी आजोबांची डायरी: भाग ४८

दोन वर्षापूर्वीची गोष्ट आहे. जर्मनीत हॅनोवर शहरात ज्या सिनियर केअर होममध्ये मी सायकॉलॉजीस्ट म्हणून काम करतेय, तिथे भेटायला मिळालेल्या अविस्मरणीय व्यक्तीमत्त्वांपैकी एक अशा आजोबांची गोष्ट मी आता सांगणार आहे. तांबूस पिंगट रंगाचे डोळे, कॉफी कलरच्याच पण लाईट आणि डार्क अशा वेगवेगळ्या शेड्सच्या पॅन्ट्स, वेगवेगळ्या रंगांचे पण कायमच चेक्सचे कॉलर असलेले फुल किंवा हाफ शर्ट घालणारे, छान उंची आणि बांधा असलेले असे एक आजोबा आमच्या संस्थेत दाखल झाले. नाकीडोळे खूपच रेखीव आणि सरळ रेषेत असलेले पांढरेशुभ्र दात ते हसले की चमकतांना दिसत. ते दात खरे होते की ती कवळी होती, याची कल्पना नाही. ते ज्या रंगाचा शर्ट घालत, त्याचं प्रतिबिंब डोळ्यात पडल्याने त्यांचे डोळे कधी हिरवे तर कधी निळे असे वेगवेगळ्या रंगांचे दिसत. असे हे गोड आजोबा, बोलायलाही तितकेच गोड. आमच्या पहिल्या भेटीतच त्यांनी माझं भरभरून कौतुक केलं. माझा हात हातात घेऊन म्हणले होते, "आह! सकीना! किती सुंदर दिसता तुम्ही. तुमचा रंग, तुमचा गंध..." मला गंमत वाटली हे ऐकून आणि मी फक्त हसले होते यावर. जर्मनीत आल्यापासून अशाप्रकारे कौतुक करणारी मंडळी म

आज्जी आजोबांची डायरी: भाग ४७

"आजीच्या जवळी घड्याळ कसले, आहे चमत्कारिक, देई ठेवुनी ते कुठे अजूनही, नाही कुणा ठाऊक.."  माझे बाबा त्यांच्या नातवंडांना झोपवतांना गात असलेलं गाणं ऐकलं की मला माझी आज्जी-आईची आईच आठवायची कायम. ह्या गाण्यातल्या आज्जीकडे कुठलेही घड्याळ नसूनही तिला दिवसाचा कुठला प्रहर आणि वेळ सांगता यायची, तशीच माझ्या कस्तुरा आज्जीलाही यायची.  ती निरक्षर होती. पण आता किती वाजले असतील, हे ढोबळपणे सांगू शकायची कायम. नाशिक पुणे रस्त्यावर येणाऱ्या स्टेशन्सची नावं आणि त्यांची ऑर्डरही तिला अचूकपणे सांगता यायची. इतकेच नाही तर ती हिशोबातही चोख होती. आज हे गाणं आठवायचं कारण म्हणजे जर्मनीतील हॅनोवर शहरात एका सिनियर केअर होममध्ये सायकॉलॉजीस्ट म्हणून काम करते, तिथे मला भेटलेल्या एक उत्साही आज्जी.  त्यांची गोष्ट मी आज सांगतेय. केक आणि कुकीज बेकिंगमधल्या त्या एक्स्पर्ट.वेगवेगळ्या व्हरायटीचे केक बनवतांना त्या माप फक्त 'फील' करतात. टायमरही लावत नाहीत. ओव्हनमधल्या केककडे बघूनच त्यांना कळतं की तो बेक झाला असेल की नाही. केक माझा लहानपणापासून आवडता. पण तो बेकरीत मिळणारा नाही तर माझ्या आईच्या हातचा. माझी आ

आज्जी आजोबांची डायरी: भाग ४६

मी सायकॉलॉजीस्ट म्हणून काम करत असलेल्या जर्मनीतील सिनियर केअर होममध्ये मी दुपारच्या राउंडला गेलेले होते. दुपारची वेळ  वामकुक्षीची, त्यामुळे शक्यतो दरवाजा वाजवून कोणाची झोपमोड करणे, मी टाळते. जे जागे असतात, हे माहिती असते, त्यांनाच भेटते किंवा ज्यांचे दार उघडेच असते, तिथे हळुच डोकावून, जागे आहेत ही खात्री करून घेऊन मग भेटायला, बोलायला जाते. अशाच एका दुपारी दुसऱ्या मजल्यावरच्या एका डबलरूमचे दार उघडे दिसले म्हणून मी चेक करायला गेले. एका बेडवरच्या आज्जी गाढ झोपलेल्या आणि दुसऱ्या वाचत बसलेल्या होत्या. झोपलेल्या आज्जींना डिस्टर्ब होऊ नये, म्हणून मी वाचत बसलेल्या आज्जींनाही हॅलो वगैरे न करता तिकडून निघाले. आज्जींची आणि माझी नजरानजरही झालेली नव्हती, त्यामुळे मला वाटलं, त्या वाचनात गढलेल्या आहेत. मात्र मी जशी बाहेर जायला वळले, तशा त्या म्हणाल्या, कोण आहे? मी कोण ते हळू आवाजात सांगितले आणि ह्या दुसऱ्या आज्जी झोपल्या असल्याने आपण नंतर बोलूया, असे म्हणाले. त्यावर ह्या आज्जी वैतागून म्हणाल्या, त्या तर कायमच झोपलेल्याच असतात, मग तुम्ही माझ्याशी कधी बोलणार? मी ही माणूस आहे, मलाही कोणीतरी बोलायला लाग