आज्जी आजोबांची डायरी: भाग ५०
डायरीच्या मागच्या भागात स्वतःच्या पायाच्या बोटाला इजा करून घेणाऱ्या ज्या आजोबांविषयी लिहिले, ते आजोबा अजूनही हॉस्पिटलमध्येच आहेत. त्यांचे काही अपडेट्स समजले नाहीत. पण आज काही आठवड्यांनंतर हॉस्पिटलमधून परतलेल्या आजोबांना भेटले आणि त्यांची गोष्ट आज लिहायलाच हवी, असं मनात आलं म्हणून काम संपल्याबरोबर लगेच लिहितेय. काही महिन्यांपूर्वी एकत्रच आमच्या सिनिअर केअर होममध्ये जोडीनेच हे आज्जी आजोबा दाखल झाले. ९३ वर्षं वयाच्या आज्जी बेड रिडन आणि विस्मरणाचा आजार जडलेल्या तर आजोबा आज्जींपेक्षा २ वर्षांनी मोठे पण अजूनही बऱ्यापैकी फिटनेस असलेले.. कसल्याही आधाराशिवाय चालू फिरू शकणारे आणि आपली सगळी कामं स्वावलंबीपणे करू शकणारे असे. "मी केवळ माझ्या बायकोसाठी इथे दाखल झालो आहे. ६७(की असाच काहीतरी आकडा) वर्षांचा आमचा संसार. कायम एकत्रच राहिलोय तर आता या टप्प्यावर तिला सोडून राहू शकत नाही, म्हणून इकडे दाखल झालो." असं कारण त्यांनी मला सांगितलं. आज्जी विशेष काही बोलू शकत नव्हत्या, पण आमचं बोलणं त्यांच्यापर्यंत पोहोतच होतं आणि त्यांना समजतही होतं, असं त्यांच्या एकंदरीत हावभावावरून मला जाणवलं. आज