खंड १ ला: १४. माझी पसंती
खंड १ ला:
१४. माझी पसंती
- मूळ पुस्तक: #सत्याचे #प्रयोग #अथवा #आत्मकथा
- लेखक: #मोहनदास #करमचंद #गांधी
- अनुवादक : सीताराम पुरुषोत्तम पटवर्धन
- नवजीवन प्रकाशन मंदिर, अहमदाबाद-१४
- चौथी आवृत्ती ( १४.०३.१९६९)
- पान नं. ४३-४६
- सोशल मीडिया टायपिंग : सकीना वागदरीकर/ सखी जयचंदर
-आत्तापर्यंतचे सर्व भाग एकत्रित वाचण्यासाठी लिंक: https://sakhi-sajani.blogspot.com
************************************
डॉ. मेहता सोमवारी मला व्हिक्टोरिया हॉटेलात भेटण्यास गेले. तेथे त्यांना आमचा नवा पत्ता मिळाल्यावरून नवीन ठिकाणी आले. माझ्या मूर्खपणामुळेच मला आगबोटीत गजकर्ण झाले होते. बोटीत खाऱ्या पाण्याचे स्नान असे. खाऱ्या पाण्यात साबण विरघळत नाही. पण माझी तर समजूत अशी की साबण वापरण्यातच सभ्यपणा आहे. त्यामुळे शरीर साफ होण्याऐवजी चिकट होई. त्यामुळे गजकर्ण झाले. डॉक्टरांना दाखविले. त्यांनी मला दाहक औषध- ऍसेटिक ऍसिड- दिले. या औषधाने मला चांगलेच रडवले. डॉक्टर मेहतांनी आमची खोली वगैरे पाहिली आणि डोके हलवले. "ही जागा नाही चालणार. या देशात येऊन नुसते पुस्तकी शिक्षण घेण्यापेक्षा येथील अनुभव घेण्याचेच जास्त महत्त्व आहे. त्यासाठी कोणत्या तरी कुटुंबात राहणे जरुरीचे आहे. परंतु तत्पूर्वी थोडेसे शिक्षण घेण्यासाठी तुम्ही______ कडे रहावे असा मी विचार केला आहे. तिकडे तुम्हाला घेऊन जातो."
मी ती सूचना आभारपूर्वक मान्य केली. त्या मित्राकडे गेलो. त्यांनी माझ्या बडदास्तीत काही न्यून ठेविले नाही. माझी आपल्या सख्ख्या भावाप्रमाणे काळजी घेतली. इंग्रजी रीतीरिवाज शिकवले. इंग्रजी थोडेफार बोलण्याची सवय त्यांनीच पाडली असे म्हणता येईल.
माझ्या खाण्यापिण्याचा प्रश्न फार बिकट होऊन राहिला. मीठ-मसाल्याखेरीजच्या भाज्या आवडत ना. माझ्यासाठी काय शिजवावे हेच घरधनीणबाईला सुचेना. सकाळी ओटच्या पिठाची लापशी होत असे, त्यामुळे पोट काहीतरी भरे; पण दुपारी व रात्री उपासमार होई. मित्र मांसाहार करण्याबद्दल रोज समजूत घाली. मी आपला प्रतिज्ञाचे आडकाठी सांगून स्वस्थ बसे. त्यांच्याशी वाद घालण्याची माझी ताकद नव्हती. दुपारी फक्त रोटी आणि तांदुळज्याची भाजी व मुरंबा यावर राहत असे. रात्रीही तेच खाणे. मला असे दिसले, की रोटीचे दोन-तीन तुकडे घेणेच प्रशस्त; जास्त मागण्याची लाज वाटे. मला भरपूर खाण्याची सवय होती. जठराग्नि प्रदीप्त होता आणि त्याची मागणी खूप असे. दुपारी काय किंवा संध्याकाळी काय, दुधाचे नाव नाही. माझी अशी स्थिती पाहून मित्र एक दिवस चिडले, आणि म्हणतात, "हे बघ, तू माझा सख्खा भाऊ असतात तर मी तुला खात्रीने परत लावून दिले असते. निरक्षर आईला येथील स्थिती जाणून न घेता दिलेल्या वचनाची किंमत ती काय? त्याला प्रतिज्ञा म्हणताच येत नाही. मी तुला सांगतो, की कायद्याच्या दृष्टीनेही ती प्रतिज्ञा होत नाही. असल्या प्रतिज्ञेला चिकटून राहणे म्हणजे निव्वळ भ्रम आहे. आणि असा भ्रम उराशी बाळगून राहिलास तर तुला या देशातून काहीच मिळवून स्वदेशी जाता येणार नाही. तू तर म्हणतोस की तू मांस खाल्ले आहेस, तुला ते आवडलेही. जेथे खाण्याची मुळीच जरूर नव्हती तेथे खाल्लेस, आणि खाण्याची खास जरूर आहे तेथे वर्ज्य; काय आश्चर्य आहे,,"
माझ्याकडून एक नाही की दोन नाही,,
असले युक्तिवाद रोज चालत. बहात्तर रोग बरे करणारा एक नन्नाचा पाढाच माझ्यापाशी होता. मित्र जसजशी माझी समजूत घालण्याचा प्रयत्न करीत, तसतशी माझी दृढता वाढत जाई. रोज ईश्वरापाशी रक्षणाची याचना करीत असे आणि ते रक्षण मला मिळेही. ईश्वर म्हणजे काय ते मला कळत नव्हते. परंतु त्या रंभेने शिकविलेली श्रद्धा आपले काम करून राहिली होती.
एके दिवशी मित्रांनी माझ्यापाशी बेंथॅमचा ग्रंथ वाचण्यास सुरुवात केली. उपयुक्ततावादासंबंधी वाचले. मी घाबरलो. भाषा अवघड. मला कळताना मारामार! मित्र अर्थ समजावून सांगू लागले. मी उत्तर दिले:
"मला तुम्ही क्षमा करावी अशी माझी इच्छा आहे. असले सूक्ष्म प्रश्न मला समजत नाहीत. मांस खाल्ले पाहिजे हे मी कबूल करतो. परंतु माझ्या प्रतिज्ञेचे बंधन मी तोडू शकत नाही. याबद्दल मला युक्तिवाद करता येणार नाही. युक्तिवादात मी तुम्हाला जिंकू शकणार नाही, याबद्दल माझी खात्रीच आहे. परंतु मला मूर्ख समजून किंवा हट्टी समजून या बाबतीत तुम्ही मला सोडून द्यावे. तुमचे प्रेम मला समजते. तुमचा हेतू समजतो. मी तुम्हाला आपले परमहितेच्छु मानतो. तुम्हाला वाईट वाटते त्यामुळे तुम्ही मला आग्रह करता हेही मला दिसतेच आहे. पण माझा निरुपाय आहे. प्रतिज्ञेचा भंग होणार नाही."
मित्र पाहत राहिले. त्यांनी पुस्तक बंद केले. "बस्स; आता मी वाद करणार नाही" असे म्हणून गप्प बसले. मला बरे वाटले. तेव्हापासून त्यांनी युक्तिवाद करण्याचे सोडून दिले.
पण माझ्याबद्दल त्यांना वाटणारी चिंता दूर झाली नाही. ते विडी पीत असत, दारू पीत असत. मला त्यापैकी एकही गोष्ट करण्याबद्दल त्यांनी सांगितले नाही; उलट त्या न करण्याबद्दल सांगत. मांसाहाराच्या अभावी मी अशक्त होईन आणि इंग्लंडात मला मोकळेपणाने राहता येणार नाही याची त्यांना चिंता वाटे.
याप्रमाणे एक महिन्यापर्यंत मी नवशिक्या म्हणून उमेदवारी केली मित्रांचे घर रिचमंडमध्ये होते. त्यामुळे लंडनला आठवड्यातून एकदोन वेळीच जाणे होई. आता मला एखाद्या कुटुंबात ठेवले पाहिजे असा विचार डॉ. मेहता व दलपतराम शुक्ल यांनी केला. भाई शुक्ल यांनी वेस्ट केंसिंग्टनमध्ये एका अँग्लो-इंडियनाचे घर शोधले आणि मला तेथे ठेवले. घरधनीणबाई विधवा होती. तिला माझ्या मांसत्यागाची गोष्ट सांगितली. म्हातारीने माझी व्यवस्था करण्याचे कबूल केले. मी तेथे राहिलो. तेथे माझे दिवस उपासमारीत जाऊ लागले. मी घरून मिठाई वगैरे खाण्याचे जिन्नस मागवले होते, ते अजून आले नव्हते. सर्वच आळणी लागे. म्हातारी रोज विचारपूस करी; पण ती तरी काय करणार? शिवाय, अजुन मी भिडस्तच होतो. त्यामुळे जास्त मागण्याचा संकोच वाटे. बाईला दोन मुली होत्या. त्या आग्रहपूर्वक थोडी आणखी रोटी घालीत; परंतु त्या बिचाऱ्यांना काय माहित, कि त्यांची सगळी रोटी खाऊन टाकीन, तेव्हा कुठे माझे पोट भरण्यासारखे होते!
परंतु आता मला पंख फुटू लागले होते. अजून अभ्यास सुरू झाला नव्हता. जेमतेम वर्तमानपत्रे वाचू लागलो होतो. हा भाई शुक्लांच्या प्रताप होय. हिंदुस्थानात मी कधी वर्तमानपत्रे वाचली नव्हती. पण अभ्यासाने ती वाचण्याची आवड उत्पन्न करु शकलो. 'डेली न्यूज', 'डेली टेलिग्राफ' आणि 'पॅलमॅल गॅझेट' एवढया पत्रांवरून नजर फिरवीत असे. पण त्यात सुरुवातीला फार तर एक तास जात असेन.
मी आता हिंडणे सुरू केले. मला निरामिष, म्हणजे शाकाहार देणारे भोजनगृह शोधायचे होते. अशा तऱ्हेच्या काही खानावळी आहेत असे घरधनीणीनेही सांगितले होते. मी रोज दहा-बारा मोबाईल चालत असे. स्वस्तशा भोजनगृहात जाऊन पोट भरून घेई, परंतु समाधान होईना. अशा तऱ्हेने भटकता भटकता मी एक दिवस फेरिंग्डन स्ट्रीटवर जाऊन पोचलो व व्हेजिटेरियन रेस्टोराँ (शाकाहारी भोजनगृह) हे नाव वाचले. लहान मुलाला आवडीची वस्तू मिळाल्याने जसा आनंद व्हावा तसा मला झाला. मी हर्षाने वेडा होऊन आज शिरणार त्यापूर्वीच दरवाजाजवळील काचेच्या खिडकीत विकायची पुस्तके दिसली; त्यामध्ये मी सॉल्टचे 'अन्नाहाराचे समर्थन' या नावाचे पुस्तक पाहिले. एक शिलिंग देऊन विकत घेतले, आणि जेवायला बसलो. इंग्लंडात आल्यानंतर पोट भरून खायला प्रथम येथे मिळाले. ईश्वराने माझी भूक शांत केली,,
सॉल्टचे पुस्तक वाचले. माझ्या मनावर त्याचा उत्कृष्ट परिणाम झाला. हे पुस्तक वाचल्या दिवसापासून मी स्वेच्छेने म्हणजे बुद्धिपूर्वक शाकाहाराच्या मताचा झालो. मातेपाशी केलेली प्रतिज्ञा आता मला विशेष आनंददायी होऊन राहिली. अजूनपर्यंत मी "सर्व लोक मांसाहारी बनतील तर चांगले" असे मानीत होतो. आणि प्रथम केवळ सत्यपालनार्थ व मागून प्रतिज्ञापालनार्थच मांसत्याग करीत होतो. तसेच पुढे कधीकाळी स्वतः उघडपणे मनमुराद मांस खाऊ लागून इतरांनाही मांसाहाऱ्यांच्या कंपूत ओढण्याची उमेद बाळगीत होतो. परंतु आता याच्या उलट, स्वतः शाकाहारी राहून इतरांना तसे बनविण्याची इच्छा उत्पन्न झाली.

Comments
Post a Comment