आज्जी-आजोबांची डायरी: भाग ३६
मागच्या आठवड्याभरात बऱ्याच घडामोडी घडल्या. त्यातली एक सकारात्मक म्हणजे ज्या आज्जींची कोविड टेस्ट पॉझिटीव्ह आलेली होती, त्यांची नंतरची टेस्ट निगेटिव्ह आली. त्यांच्या संपर्कात आलेल्या रहिवाश्यांची आणि सर्व कर्मचाऱ्यांची टेस्टही निगेटिव्ह आली. तरीही त्या ज्या मजल्यावर राहत होत्या, तो मजला आयसोलेट करण्यात आला आणि ह्या आज्जी तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या इतर आज्जी आजोबांना चौथ्या मजल्यावर म्हणजेच जिथे मी गेले दोन महिने ड्यूटीला होते, तिथे शिफ्ट करण्यात आले आणि तो मजला पुन्हा एकदा आयसोलेट करण्यात आला. त्या मजल्यावर आत्तापर्यंत राहत असलेल्या आणि क्वारंटाईनमध्ये असलेल्या रहिवाश्यांना पहिल्या आणि तिसऱ्या मजल्यावर शिफ्ट करण्यात आले. त्यांनाही रूमबाहेर न पडण्याचे सांगण्यात आले होते. जेवणही रुममध्येच सर्व्ह केले जाणार, असे समजले असल्याने त्यातल्या सोशल नेचरच्या आज्जी आजोबांमध्ये पॅनिक परीस्थिती निर्माण झाली. १ जुलैला आजोबांच्या फ्युनरलाला जाऊन आलेल्या आज्जींची गोष्ट सांगितली आहेच, त्याच दिवशी सर्व आज्जी आजोबांना करोना परिस्थिती आणि दुपारच्या कॉफीब्रेकला सर्वांनी रूममध्येच थांबावे, असे