Posts

Happy Mother's Day: एक आठवण

Image
 Happy Mother's Day my dearest Mom.. तू आहेस म्हणून मी आहे💕 मला आजही ती दुपार आठवते आहे.. मी शाळेतून घरी आलेले होते. उज्ज्वला मावशी आणि मीच घरी होतो. रणरणत्या उन्हातली ती दुपार होती. मी नेहमीप्रमाणे घराबाहेरच्या पायरीवर बसून सूर्याच्या डोळ्यात डोळे घालून बघत बसलेले होते. खूप खूप कंटाळलेले होते. मला तुझी खूप आठवण येत होती आणि तू ऑफिसला गेलेली होतीस. मावशीने रेडिओ लावलेला होता. त्यावर गाणी सुरू होती. पुढचं गाणं सुरू झालं.  "कितना हसीन हैं ये इक सपना  फुलोंकी शहर में हैं घर अपना   क्या समा हैं तू कहा हैं   मैं आई आई आई आई.. आजा.." गाण्यातले आई आई आई आई शब्द ऐकून तूच मला डोळ्यासमोर दिसलीस. मी एकदम व्याकुळ झाले तुझ्या आठवणीने आणि मला एकदम रडूच कोसळलं... ते गाणं कधीही आठवलं की मला तोच प्रसंग आठवतो.  संध्याकाळी तू घरी परत आलीस की तुझ्या कुशीत मला स्वर्ग लाभायचा. लव्ह यू आई... आमच्यासाठी तू आणि बाबा दिवसभर खूप खूप झटलात, इच्छा नसतांनाही मनावर दगड ठेवून कामावर गेलात. म्हणून आम्ही आज सुखाचे दिवस बघत आहोत. त्यावेळी उज्ज्वला मावशीने आम्हाला सोबत केली, आम्हाल...

दूर का राही चित्रपट परीक्षण: १

Image
बेकरारे दिल... तू गाये जा... खुशीयोंसे भरे अफसाने  जिन्हे सूनके दुनिया झूम उठी और झूम उठे दिल दिवाने  बेकरारे दिल... अरे, तू गाये जा... अनेक वर्षांनी अचानक हे गाणं कोणीतरी सोशल मीडियावर गातांना बघायला मिळालं. ते सूर मनात घोळत राहिले, म्हणून मग मूळ गाणं शोधून ते बघितलं. अत्यंत जुन्या, ब्लॅक अँड व्हाईटच्या जमान्यातलं एक गीत अशोक कुमार पियानो वाजवत गात होते. त्यांच्या डोळ्यात दुःखाचा सागर... ते ऐकत असणाऱ्या किशोर कुमारांचे डोळेही असेच दुःखाने भरलेले... ते गाणं ऐकून अस्वस्थ झालेली तनुजा, आपल्या बेडरुममधल्या बेडवरून उठून पळतच जिने उतरत अशोक कुमारजवळ पोहोचते.  त्यांचे पहिले कडवे संपल्यावर पुढचे कडवे ती गाते. ते गात असतांना तिला तिचा जोडीदार आणि त्याच्यासोबत घालवलेले आनंदाचे क्षण तिच्या डोळ्यासमोर येतात.. जे आपल्यालाही प्रेक्षक म्हणून बघायला मिळतात. त्यावेळी ती गात असते,  "जिन्हे सून के दुनिया झूम उठी और झूम उठे दिल..." आणि तिला ते वाक्य पूर्ण करता येत नाही कारण तिला खूप रडू येतं आणि आवंढा येऊन त्यात तिचे शब्द गिळले जातात..   इतकं दर्दभरं गीत बघून माझं मन एकदम आक्...

दूर का राही चित्रपटपरीक्षण

Image
बेकरारे दिल... तू गाये जा  खुशीयोंसे भरे अफसाने  जिन्हे सूनके दुनिया झूम उठी और झूम उठे दिल दिवाने  बेकरारे दिल... अरे, तू गाये जा... अनेक वर्षांनी अचानक हे गाणं कोणीतरी सोशल मीडियावर गातांना बघायला मिळालं. ते सूर मनात घोळत राहिले, म्हणून मग मूळ गाणं शोधून ते बघितलं. अत्यंत जुन्या, ब्लॅक अँड व्हाईटच्या जमान्यातलं एक गीत अशोक कुमार पियानो वाजवत गात होते. त्यांच्या डोळ्यात दुःखाचा सागर... ते ऐकत असणाऱ्या किशोर कुमारांचे डोळेही असेच दुःखाने भरलेले... ते गाणं ऐकून अस्वस्थ झालेली तनुजा, आपल्या बेडरुममधल्या बेडवरून उठून पळतच जिने उतरत अशोक कुमारजवळ पोहोचते.  त्यांचे पहिले कडवे संपल्यावर पुढचे कडवे ती गाते. ते गात असतांना तिला तिचा जोडीदार आणि त्याच्यासोबत घालवलेले आनंदाचे क्षण तिच्या डोळ्यासमोर येतात.. जे आपल्यालाही प्रेक्षक म्हणून बघायला मिळतात. त्यावेळी ती गात असते,  "जिन्हे सून के दुनिया झूम उठी और झूम उठे दिल..." आणि तिला ते वाक्य पूर्ण करता येत नाही कारण तिला खूप रडू येतं आणि आवंढा येऊन त्यात तिचे शब्द गिळले जातात..   इतकं दर्दभरं गीत बघून माझं मन एकदम ...

Son of Sardar 2

Son of Sardar 2 हा सिनेमा काल Netflix वर बघितला. अजय देवगण आवडता अभिनेता त्यामुळे चटकन क्लिक केला आणि बघायला सुरुवात केली. कॉमेडी जॉनरचा असल्याने विनोद अपेक्षित होतेच पण ते इतके पांचट असतील, असं नव्हतं वाटलं, त्यामुळे सुरुवात बघून मी काही दिवसांपूर्वी बंद करून टाकला होता.  काल मात्र जिथून थांबवला, तिथून परत सुरू केला आणि हसून हसून लोटपोट झाले अगदीच... आणि हुक्ड अप झाले या चित्रपटात.  तो सीन होता, लंडनमध्ये पंजाबी शीख कुटुंबातला मुलगा आणि त्याचं कुटुंब जेवायला एकत्र बसलेले असतं आणि मुलगा वडिलांना तो प्रेमात पडलेल्या मुलीविषयी सांगत असतो. त्या मुलीची काहीही पार्श्वभूमी त्याला माहिती नसते आणि असल्या काहीच माहिती नसलेल्या कुटुंबात आपलं बेस्ट ब्रीड mix up होता कामा नये, असं वडील मुलाला सांगत असतात. हे सांगतांना ते खुद्द स्वतःचं उदाहरण देतात. ते त्याला सांगतात की तू सातव्या महिन्यात जन्माला आला होतास पण दिसत मात्र पूर्ण वाढ झालेल्या नऊ महिन्याच्या बाळासारखा होतास. हे आहे आपलं स्ट्राँग ब्रीड. त्यावेळी आईवर कॅमेरा टाकतात आणि यात काहीतरी गौडबंगाल आहे, याची खात्री पटवणारे तिचे हावभाव अस...

आज्जी-आजोबांची डायरी: भाग ५३

हॅनोवर, जर्मनीतील सिनियर केअर नर्सिंग होममध्ये काम करत असतांना काही वेळा अशी व्यक्तिमत्व मला भेटतात, जी बघून मला वाटतं की मी त्यांची सायकॉलॉजिस्ट आहे की ते माझे? काल ज्यांच्याशी ओळख झाली, त्या आज्जींबाबतीत मला असंच वाटलं. ११.११.४४ अशी युनिक जन्मतारीख असलेल्या या जर्मन आज्जीही अतिशयच युनिक आहेत.  या महिन्यात १० ऑक्टोबरला आमच्या संस्थेत दाखल झालेल्या या आज्जी त्याच दिवशी माझी सुट्टी सुरू झाल्याने माझ्या संपर्कात येऊ शकल्या नाहीत.  काल सोमवार असल्याने वीकेंडच्या आरामानंतर डोळे चोळत सुरू केलेले काम आणि ते सुरू करतांना सुरुवातीला आरामात संस्थेच्या किचनमधून गरमगरम कॉफी आणून ती घेत घेत इमेल्स वाचणे, डॉक्युमेंटशन वाचणे, त्या दिवशी कोणाला भेटायचे, याचे प्लॅनिंग करणे, या माझ्या रूटीनला फाटा बसला. कारण माझ्या टीम लीडरने मला सांगितले त्या एक आज्जी फार अस्वस्थ असतात आणि त्यांना भेट आणि शांत करण्याचा प्रयत्न कर. मी म्हणाले ओके.   आज्जींशी अजून ओळख झालेली नसल्याने लगेच आज्जींचे जुने डॉक्युमेंटेशन वाचून त्यांची थोडी माहिती काढून जाऊ,  अजून कोणाला भेटणे आवश्यक असेल, तर ती लिस्ट ...

आज्जी आजोबांची डायरी: भाग ५२

दोन वर्षांनी धक्का स्टार्ट केलेली डायरीची गाडी आता सुसाट सुटली असल्याने लिहून डोळे आणि अंगठा हे अवयव थकले असले तरी मन मात्र फ्रेश झालेले आहे. तो लिहिण्याचा flow किती काळ टिकेल, मी पण सांगू शकत नाही. त्यामुळे लगेच पुढचा भाग लिहित आहे. (अशी सुरुवात करून आणि थोडे लिहून झाल्यावर काही पुढे लिहिणे झाले नाही, ते डायरेक्ट आजच पूर्ण करू शकले.) हॅनोवरमधील सिनियर केअर होममध्ये सायकॉलॉजिस्ट म्हणून काम करत असतांना भेटत असलेल्या लोकांमध्ये सगळ्यात वेगळे, युनिक म्हणता येईल असे आणि अतिशय इंटरेस्टिंग व्यक्तिमत्व मला मागच्या महिन्यात भेटले. ती भेट पटकन शब्दात नाही उतरवली, तर त्यातले बरेचसे तपशील मीच विसरून जाईन, म्हणूनही लगेच लिहित आहे.  मागच्या महिन्यातली गोष्ट..  आदल्या दिवशी दुपारी नवीन रेसिडेंट दाखल झाल्याची इमेल वाचली आणि लगेच त्यांना भेटायला गेले. त्या बाई फोनवर बोलत होत्या आणि त्यांच्या अंगावर काहीही कपडे नव्हते. त्या मात्र या बाबतीत रिलॅक्स होत्या, असे जाणवले. मी नर्सला नंतर याबाबतीत विचारले, तर तिने काहीतरी सांगितले, जे काही मला नीटसे आठवत नाहीये. मागच्या भागात उल्लेख केलेली मलमूत्र वि...

आज्जी आजोबांची डायरी: भाग ५१

बरोबर दोन वर्ष होतील काही दिवसांनी डायरीचा ५० वा भाग लिहून.. साडेपाच वर्षं झाली बघता बघता जर्मनीतील हॅनोवर शहरात सिनिअर केअर होम मध्ये सायकॉलॉजिस्ट म्हणून काम करायला सुरुवात करून. इथे काही दिवसांसाठी ऍडमिट झालेले ते कायमचे रहायला आलेले असे कितीतरी लोक रोज पहायला मिळतात. माझ्याकडून त्यांना एक मनापासून ऐकणारा कान मिळतो, तर त्यांचे बोलणे ऐकत असतांना वेगवेगळ्या जीवनानुभवांनी मी समृद्ध होत जाते. अशाच एका आज्जींची गोष्ट आज मी सांगणार आहे. शुक्रवारी आमच्या संस्थेत एक ऐंशी प्लस वयाच्या आज्जी दाखल झाल्या. त्यांच्याशी गप्पा मारायला सुरुवात केली आणि त्यांच्याकडून जर्मनीतील गरीब लोक एकेकाळी कसे राहत असतील, ह्या कधी मनातही न आलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले.  अतिशय नीटनेटक्या, फ्रेश दिसणाऱ्या, केसांची छान स्टाईल केलेल्या, एका पायाला लागलेले असल्याने बँडेड लावलेल्या, व्हीलचेअर वर बसुन इकडे तिकडे जाणाऱ्या आणि सतत एकतर चेक लिही किंवा शब्दकोडे सोडव, असं करत स्वतःला गुंतवून घेतलेल्या सोफिस्टिकेटेड, मृदुभाषी आणि गोड अशा या जर्मन आज्जींनी किती गरिबीत आयुष्य काढून इथवरचा पल्ला गाठलेला आहे, याचा अंदाज करत...

आमची लंडन ट्रिप

आमची लंडन ट्रिप शनिवार दि. 16 मार्च ते बुधवार दि. 20 मार्च असे प्रवास धरून एकूण पाच दिवसांची लंडन ट्रिप आम्ही केली. खूप दिवसांपासून मनात असलेली ही ट्रिप फायनली प्रत्यक्षात करता आली. भारतात राहत असतांना इंग्रजी ही आंतरराष्ट्रीय भाषा आहे, हे ऐकतच मोठे झालेलो असतो आपण. मात्र युरोपियन देशांमध्ये आलो की हा समज साफ खोटा ठरावा, असे अनुभव येतात, जे अर्थातच मलाही आले. जर्मनीत राहायला लागले आणि इथे इंग्रजी चालत नाही, हे कळले. इतरही युरोपियन देशांमध्ये कमी अधिक प्रमाणात हीच परिस्थिती असल्याचं लक्षात आलं. इंग्रजी येत असूनही समोरच्याला त्यांची भाषा बोलायला प्रवृत्त करून त्यांच्या भाषेचं जतन करण्याचं महत्वाचं काम हे देश करतात. त्यांचं म्हणणं असतं की इंग्लिश लोक शिकतात का तुमची भाषा? ते तुम्हालाच इंग्रजी शिकून बोलायला लावतात ना? मग आम्हीही तेच करतो! ह्या पार्श्वभूमीवर लंडन ट्रिप करायचं ठरवलं आणि सगळ्यात पहिली गोष्ट मनात आली, ती म्हणजे जिथे आपल्याला व्यवस्थित समजते, बोलता येते, ती भाषा असलेल्या देशात आपण जात आहोत आणि या गोष्टीचे प्रचंड थ्रील मनात होते. शिवाय ज्या ब्रिटिशांनी आपल्यावर राज्य केले, त्य...

आज्जी आजोबांची डायरी: भाग ५०

  डायरीच्या मागच्या भागात स्वतःच्या पायाच्या बोटाला इजा करून घेणाऱ्या ज्या आजोबांविषयी लिहिले, ते आजोबा अजूनही हॉस्पिटलमध्येच आहेत. त्यांचे काही अपडेट्स समजले नाहीत. पण आज काही आठवड्यांनंतर हॉस्पिटलमधून परतलेल्या आजोबांना भेटले आणि त्यांची गोष्ट आज लिहायलाच हवी, असं मनात आलं म्हणून काम संपल्याबरोबर लगेच लिहितेय. काही महिन्यांपूर्वी एकत्रच आमच्या सिनिअर केअर होममध्ये जोडीनेच हे आज्जी आजोबा दाखल झाले.  ९३ वर्षं वयाच्या आज्जी बेड रिडन आणि विस्मरणाचा आजार जडलेल्या तर आजोबा आज्जींपेक्षा २ वर्षांनी मोठे पण अजूनही बऱ्यापैकी फिटनेस असलेले.. कसल्याही आधाराशिवाय चालू फिरू शकणारे आणि आपली सगळी कामं स्वावलंबीपणे करू शकणारे असे. "मी केवळ माझ्या बायकोसाठी इथे दाखल झालो आहे. ६७(की असाच काहीतरी आकडा) वर्षांचा आमचा संसार. कायम एकत्रच राहिलोय तर आता या टप्प्यावर तिला सोडून राहू शकत नाही, म्हणून इकडे दाखल झालो." असं कारण त्यांनी मला सांगितलं. आज्जी विशेष काही बोलू शकत नव्हत्या, पण आमचं बोलणं त्यांच्यापर्यंत पोहोतच होतं आणि त्यांना समजतही होतं, असं त्यांच्या एकंदरीत हावभावावरून मला जाणवलं. आज...

आज्जी आजोबांची डायरी: भाग ४९

एका वर्षाच्या वर झालं मला डायरी लिहून. आज एका मैत्रिणीने आठवण काढली डायरीची आणि परत लिहायला घेतलं. ज्यांनी माझी डायरी वाचलेली नाहीये त्यांच्यासाठी माहिती. मी जर्मनीत एका सिनिअर केअर नर्सिंगहोममध्ये सायकॉलॉजीस्ट म्हणून गेली साडेतीन वर्षं काम करते आहे आणि तेथील अनुभवांवर डायरी लिहिते आहे.  रोज इतके अनुभव येतात की किती लिहू, काय लिहू, कुठून सुरुवात करू असे झाले आहे. तर मग आजच्या दिवसाबद्दलच लिहावे म्हणते! आजचा दिवस तसा युनिकच गेला म्हणायला हवं. एका भागात एका आजोबांविषयी लिहिलं होतं की ते बायको आयसोलेटेड विभागात असल्याने तिचा विरह सहन न झाल्याने त्यांनी हाताची नस कापून घेतली होती. त्या गोष्टीला आता एका वर्षापेक्षा जास्त झालंय.  त्यानंतर त्या आज्जी परत आजोबांच्या रूममध्ये परत आल्या आणि नंतर आजारपणात एक दिवस वारल्या. रात्रीची वेळ होती, त्या गेल्या तेंव्हा. ती पूर्ण रात्र पूर्णवेळ आजोबा आज्जींजवळ बसून होते. दुसऱ्या दिवशी दुपारी फ्युनरल सर्व्हिसचे लोक आज्जींना घेऊन गेले, त्या वेळपर्यंत ते आज्जींसोबत बसून होते. त्यांनी आज्जींच्या हातात एक फुलही ठेवलं होतं.  आज्जी आयसोलेटेड होत्या,...

Harz Trip

जर्मनीतील हॅनोवर शहरापासून साधारण ९० किमी अंतरावर असलेल्या Harz ह्या ठिकाणाविषयी बरंच ऐकलं होतं, पण ते पाहण्याचा योग मात्र ह्या इस्टरनिमित्त मिळालेल्या लॉंग विकेंडला आला. ह्या युनिक ट्रिपचे अनुभव लिहून काढावे, असं मनात होतंच, पण बाबांनी लिहायला सांगितल्यावर तो विचार मनात पक्का झाला.  ट्रीपला जाऊन आता एक आठवडा पूर्ण होईल, मग जसजसा वेळ जातो, तसतशा आठवणीही पुसट होत जातात. मात्र दिवस सुरू झाला की ऑफिस आणि घरकामात वेळ जातो आणि रात्री दमून झोप लागते, या सगळ्यात लिहायला वेळ कसा काढायचा , हेच समजत नव्हतं. आज मात्र मध्यरात्री जाग आली ती लिहिण्याची उर्मी येऊनच. उठ आणि लिही असं एक मन मला सांगत होतं चक्क! तर दुसरं म्हणत होतं, उद्या सकाळी लवकर उठून कामावर जायचं आहे. आत्ता जागलीस तर दिवस थकव्यात जाईल. ह्या द्वंद्वात अर्धातास पडून राहिले. शेवटी पहिल्या मनाचं ऐकायचं ठरवलं आणि उठलेच! असो, तर नमनाला घडाभर तेल ओतून झालं आहे, तेंव्हा मूळ मुद्दा सुरू करते. ह्या इस्टरच्या सुट्टीत आपण नक्की जायचं कुठे, नक्की जायचं कुठेतरी की जरा घर वगैरे नीटनेटकं आवरत भरपूर आराम करायचा, नेटफ्लिक्स सिरीज बिंज वॉज करायच्...