Son of Sardar 2
Son of Sardar 2 हा सिनेमा काल Netflix वर बघितला. अजय देवगण आवडता अभिनेता त्यामुळे चटकन क्लिक केला आणि बघायला सुरुवात केली. कॉमेडी जॉनरचा असल्याने विनोद अपेक्षित होतेच पण ते इतके पांचट असतील, असं नव्हतं वाटलं, त्यामुळे सुरुवात बघून मी काही दिवसांपूर्वी बंद करून टाकला होता.
काल मात्र जिथून थांबवला, तिथून परत सुरू केला आणि हसून हसून लोटपोट झाले अगदीच... आणि हुक्ड अप झाले या चित्रपटात.
तो सीन होता, लंडनमध्ये पंजाबी शीख कुटुंबातला मुलगा आणि त्याचं कुटुंब जेवायला एकत्र बसलेले असतं आणि मुलगा वडिलांना तो प्रेमात पडलेल्या मुलीविषयी सांगत असतो. त्या मुलीची काहीही पार्श्वभूमी त्याला माहिती नसते आणि असल्या काहीच माहिती नसलेल्या कुटुंबात आपलं बेस्ट ब्रीड mix up होता कामा नये, असं वडील मुलाला सांगत असतात. हे सांगतांना ते खुद्द स्वतःचं उदाहरण देतात. ते त्याला सांगतात की तू सातव्या महिन्यात जन्माला आला होतास पण दिसत मात्र पूर्ण वाढ झालेल्या नऊ महिन्याच्या बाळासारखा होतास. हे आहे आपलं स्ट्राँग ब्रीड. त्यावेळी आईवर कॅमेरा टाकतात आणि यात काहीतरी गौडबंगाल आहे, याची खात्री पटवणारे तिचे हावभाव असतात. त्याच वेळी त्या मुलाचे काका सांगतात की ब्रीड कुत्र्याची असते हो! माणसाचे जीन्स असतात. तर वडील म्हणतात, जीन्स तर आपण अंगात घालत असतो.
हा सीन इतका जबरी बनवला आहे की हसून हसून पुरेवाट झाल्याशिवाय राहवतच नाही.
ही फक्त एक झलक आहे. अशा अनेक सीन्स आणि विनोदांनी हा चित्रपट भरलेला आहे.
यातलं सगळ्यात जास्त मला काय आवडलं, तर आपले जे काही इश्शू ज आहेत, जसे शिख - हिंदू, भारत - पाकिस्तान, बेस्ट ब्रीड/जीन्स आणि अनेक सोशल टॅब्युज, या सगळ्यांवर अत्यंत विनोदी पद्धतीने भाष्य करून ते दूर करण्याचा प्रयत्न करत तुफान मनोरंजन केलं आहे.
स्ट्रेसबस्टर म्हणून डोकं बाजूला ठेवून हा सिनेमा नक्की एन्जॉय करावा असाच आहे.
Comments
Post a Comment