Posts

खंड १ ला: २. बालपण:

खंड १ ला: 2. बालपण: - मूळ पुस्तक: #सत्याचे #प्रयोग #अथवा #आत्मकथा - लेखक: #मोहनदास #करमचंद #गांधी - अनुवादक : सीताराम पुरुषोत्तम पटवर्धन - नवजीवन प्रकाशन मंदिर, अहमदाबाद-१४ - चौथी आवृत्ती ( १४.०३.१९६९) - पान नं. ५-७ - सोशल मीडिया टायपिंग : सकीना वागदरीकर/ सखी जयचंदर ************************************ पोरबंदरहून वडील राजस्थानी कोर्टाचे सदस्य होऊन राजकोटला गेले, तेंव्हा माझे वय सातएक वर्षांचे असावे. मला राजकोटच्या गावठी शाळेत घातले. या शाळेतील दिवस मला चांगले आठवतात. पंतोजींची नावे वगैरेही आठवतात. पोरबंदरप्रमाणेच येथिलही अभ्यासासंबंधी सांगण्यासारखे विशेष काही नाही. माझी गणना सामान्य दर्जाच्या विद्यार्थ्यांत तरी होत असेल की नाही याबद्दल शंकाच. गावठी शाळेतून मुख्य शाळेत व तेथून हायस्कुलात. येथपर्यंत पोचेतो माझ्या वयाला बारा वर्षे होऊन गेली. तोपर्यंत मी कधीही शिक्षकांशी लबाडी केल्याचे किंवा कोणाशी मैत्री जोडल्याचे स्मरत नाही. मी अतिशय भिडस्त मुलगा होतो. शाळेत माझे काम बरे की मी बरा. घंटा वाजण्याच्या सुमारास पोचायचे आणि शाळा बंद होताक्षणी घरी पळायचे. 'पळायचे' हा शब्द इ...

खंड १ ला: १. जन्म

खंड १ ला: जन्म: - मूळ पुस्तक: #सत्याचे #प्रयोग #अथवा #आत्मकथा - लेखक: #मोहनदास #करमचंद #गांधी - अनुवादक : सीताराम पुरुषोत्तम पटवर्धन - नवजीवन प्रकाशन मंदिर, अहमदाबाद-१४ - चौथी आवृत्ती ( १४.०३.१९६९) - पान नं. ३-५ - सोशल मीडिया टायपिंग : सकीना वागदरीकर/ सखी जयचंदर ************************************ गांधी कुटुंब प्रथम तरी किरण्या मालाचा व्यापार करणारे असावे असे समजते. परंतु माझ्या आजोबांपासून गेल्या तीन पिढ्या ते राज्यकारभार करीत आले आहे. उत्तमचंद गांधी उर्फ ओता गांधी दृढनिश्चयी असावेत असे दिसते. राज्य प्रकरणी लटपटीमुळे त्यांना पोरबंदर सोडावे लागले व त्यांनी जुनागडच्या राज्याचा आश्रय घेतला. त्यांनी नबाबसाहेबांना डाव्या हाताने सलाम केला. या उघड दिसणाऱ्या अविनयाचे कोणी कारण विचारले तेव्हा जबाब मिळाला, " उजवा हात तर पोरबंदरला देऊन चुकलो आहे. " होता गांधींची एकामागून एक दोन कुटुंबे झाली. पहिल्याचे त्यांना चार मुलगे होते आणि दुसऱ्याचे दोन. बालपणीची आठवण करता ते बंधु सावत्र असावेत अशा तर याची कल्पनाही मला होत नाही. त्यापैकी पाचवे करमचंद उर्फ कबा गांधी व शेवटचे तुलसीद...

प्रस्तावना

प्रस्तावना: - मूळ पुस्तक: सत्याचे प्रयोग अथवा आत्मकथा - लेखक: मोहनदास करमचंद गांधी - अनुवादक : सीताराम पुरुषोत्तम पटवर्धन - नवजीवन प्रकाशन मंदिर, अहमदाबाद-१४ - चौथी आवृत्ती ( १४.०३.१९६९) - पान नं. ३-९ - सोशल मीडिया टायपिंग : सकीना वागदरीकर/ सखी जयचंदर ************************************** चार किंवा पाच वर्षांपूर्वी निकटच्या सहकाऱ्यांच्या आग्रहावरून मी आत्मकथा लिहिण्याचे मान्य केले होते; आणि आरंभही केला. परंतु फुलस्केपचे एक पान लिहितो न लिहितो इतक्यात मुंबईची आग (संदर्भ: नोव्हेंबर १९२१ मध्ये प्रिन्स ऑफ वेल्सच्या आगमनप्रसंगी मुंबई शहरात झालेले दंगे. ते थांबेपर्यंत गांधीजींनी अनशन केले होते.) भडकली आणि मी हाती घेतलेले काम अर्धवट राहून गेले. त्यानंतर तर मी एकामागून एक असा व्यवसायात पडलो, की शेवटी मला माझे येरवड्याचे स्थान मिळाले. तेथे भाई जयरामदासही(संदर्भ: सिंधचे पुढारी श्री. जयरामदास दौलतराम) होते. त्यांनी माझ्यापाशी अशी मागणी केली, की बाकीची सर्व कामे बाजूला सारून मी पहिल्याने आत्मकथा लिहून टाकावी. त्यांना जबाब पाठवला, की माझा अभ्यासक्रम ठरून चुकला आहे आणि तो पूर्ण होईपर्य...

गांधीजींचे आत्मचरित्र

मित्र आणि मैत्रिणींनो, नमस्कार🙏 माझे, राहते शहर हॅनोवर येथील IASH ह्या भारतीय मंडळींच्या समूहात गांधीजींच्या जयंतीनिमित्त उपस्थित सर्वांना त्यांचे आत्मचरित्र भेट म्हणून मिळाले. मी त्या कार्यक्रमाला जायचे ठरवूनही ऐनवेळी जाऊ शकले नाही, म्हणून माझे ते पुस्तक हुकले. त्यामुळे खूपच वाईट वाटले. मी अनेक वर्षांपूर्वी हे आत्मचरित्र वाचलेले होते. पण तेंव्हा बरीच लहान असल्याने बराचसा भाग विसरला गेला होता. शिवाय वयानुसार अनुभवविश्व अधिक समृद्ध झाल्यावर तेच पुस्तक अधिक चांगल्या पद्धतीने समजेल, असे वाटून मी ते पुस्तक मिळवून वाचायला सुरुवात केली. झपाटल्यासारखे एका दिवसात अर्धे वाचूनही झाले! अतिशय सुंदर अनुभव होता तो! वाचतांना मनात अनेक विचार येत होते, जसे, अरे! गांधीजींची विचार करण्याची पद्धत बऱ्यापैकी माझ्यासारखी आहे की! किंवा अरेरे! पारंपरिक/ सनातनी वातावरणात वाढल्यामुळे गांधीजींना किती संयमाने जगावं लागलं. कधी विचार आला, कसला निर्मळ माणूस, किती निष्कपट, तर कधी ह्यांचे आपले काहीतरीच! मजेशीरच आहेत की हे! आमच्या घरात कायम लेख वगैरेंचे सामूहिक वाचन व्हायचे. आई, बाबा, मी आणि बहीण एकत्र बसून वाचत बस...

Introduction

Introduction: Part 1. Original Book: By M. K. Gandhi Translated from the original in Gujrati by: Mahadev Desai General Editor: Shriram Narayan Printed and published by: Navajivan Publishing House, Ahmedabad, 380014 Edition: Published in August 15, 1968 Page 16-20 Social media typing: Sakina Wagdarikar/ Sakhi Jayachandar **************************************** Four or five years ago, at the instance of my nearest co-workers, I agreed to write my autobiography. I made the start, but scarcely had I turned over the first sheet when riots broke out in Bombay and the work remained at the standatill. Then followed a series of events which culminated in my imprisonment at Yeravada. Sjt. Jeramdas, who was one of my fellow- prisoners there, asked me to put everything else on one side and finish writing the autobiography. I replied that I have already framed a programme of study for myself, and that I could not think of doing anything else until this course was complete. I should inde...

Autobiography of Gandhiji

Dear Friends, on the occasion of Gandhi Jayanti, IASH, Indian Association of Hannover had organised a program, which I could not attend. Felt really bad when I got to know that every person attended this program, got Mahatma Gandhi's Autobiography as a gift. Though I had read this book years ago, I wanted to read it once again. As time goes by, we tend to forget many things. Books are no exception to that. Also when I read this book, I was very young. My understanding that time and now, with age, maturity and experience will also give me another perspective and better understanding. With this thought in mind, I started reading this book once again. And within a day, I finished half of it! While reading, I was having mixed thoughts, like, oh wow! Gandhiji's thinking style/ thought process is just like me! Or poor Gandhiji, how much he suffered because of being a part of a conservative family or oh! What a gem of a person he was! Or how crazy his ideas sound, how funny man he ...
Hello, here is my first blog post.. Namaste to all bloggers and readers.