Hello, here is my first blog post.. Namaste to all bloggers and readers.
आज्जी आजोबांची डायरी: भाग ५२
दोन वर्षांनी धक्का स्टार्ट केलेली डायरीची गाडी आता सुसाट सुटली असल्याने लिहून डोळे आणि अंगठा हे अवयव थकले असले तरी मन मात्र फ्रेश झालेले आहे. तो लिहिण्याचा flow किती काळ टिकेल, मी पण सांगू शकत नाही. त्यामुळे लगेच पुढचा भाग लिहित आहे. (अशी सुरुवात करून आणि थोडे लिहून झाल्यावर काही पुढे लिहिणे झाले नाही, ते डायरेक्ट आजच पूर्ण करू शकले.) हॅनोवरमधील सिनियर केअर होममध्ये सायकॉलॉजिस्ट म्हणून काम करत असतांना भेटत असलेल्या लोकांमध्ये सगळ्यात वेगळे, युनिक म्हणता येईल असे आणि अतिशय इंटरेस्टिंग व्यक्तिमत्व मला मागच्या महिन्यात भेटले. ती भेट पटकन शब्दात नाही उतरवली, तर त्यातले बरेचसे तपशील मीच विसरून जाईन, म्हणूनही लगेच लिहित आहे. मागच्या महिन्यातली गोष्ट.. आदल्या दिवशी दुपारी नवीन रेसिडेंट दाखल झाल्याची इमेल वाचली आणि लगेच त्यांना भेटायला गेले. त्या बाई फोनवर बोलत होत्या आणि त्यांच्या अंगावर काहीही कपडे नव्हते. त्या मात्र या बाबतीत रिलॅक्स होत्या, असे जाणवले. मी नर्सला नंतर याबाबतीत विचारले, तर तिने काहीतरी सांगितले, जे काही मला नीटसे आठवत नाहीये. मागच्या भागात उल्लेख केलेली मलमूत्र वि...
Comments
Post a Comment