आज्जी-आजोबांची डायरी: भाग १८
सिनियर केअर होममधल्या करोना स्टेटसविषयी, त्यांनी कसे सेफ्टी मेझर्स घेतलेले आहेत आणि घेत आहेत, याविषयी लिहिले आहेच, आज थोडे बाहेरच्या जगाविषयी लिहिते. खरं म्हणजे लॉकडाऊन सुरू व्हायच्या मोजून काही दिवस आधी माझा जॉब सुरू झालेला असल्याने तेच आता माझे जग झालेय. त्यामुळे बाहेरच्या जगाचे विशेष निरीक्षण आणि चिंतन माझ्याकडून घडलेले नाहीये. पण आता हा आठवडा घरी असल्याने त्याविषयी लिहिते. विकिपेडियावरील माहितीनुसार जर्मनीत करोनाचा प्रवेश २७ जानेवारी २०२० या दिवशी झाला असून आत्तापर्यंतच्या करोनाबाधित रुग्णांची संख्या साधारणपणे १ लाख ५५ हजार आहे. बऱ्या झालेल्या लोकांची संख्या साधारणपणे १ लाख ३३ हजार आहे. करोना बळींची संख्या ५ हजार ७६० आहे. मी राहते त्या जर्मनीतल्या हॅनोवर शहरात लॉकडाऊन सुरू झाल्यापासून सगळ्यात मोठा बदल घडला, तो रस्ते अचानकपणे ओस पडले. सिटी सेंटर, जे लोकांनी खचून भरलेले असायचे, तिथे चिटपाखरूही दिसेनासे झाले. मी स्वतः लॉकडाऊन काळात जॉब ते घर असे डोअर टू डोअर सोडता कुठेही गेलेले नाही, पण माझ्या ट्रॅमरूटवर हे सिटी सेंटर येत असल्याने झालेले बदल ताबडतोब नजरेस आले. लॉकडाऊन डिक्ल