Posts

आज्जी-आजोबांची डायरी: भाग ३१

डायरीच्या आजच्या भागात मी गैरसमज कसे निर्माण होऊ शकतात आणि सुसंवादाने प्रश्न कसे सुटू शकतात, ह्याचा मला आलेला एक अनुभव सांगणार आहे. मागच्या आठवड्यातली गोष्ट आहे. मी त्या दिवशी ड्युटी संपवून घरी गेले आणि क्वारंटाईन फ्लोअरवर एक नवीन आज्जी दाखल झाल्या. दुसऱ्या दिवशी माझ्या कामाच्या स्वरूपानुसार त्यांना भेटायला गेले, तेंव्हा त्यांनी सांगितले, त्यांना श्वासाचा आजार आहे आणि अजूनही त्यांचा पफ आणि औषधं पोहोचलेली नाहीत. त्यांना श्वास घ्यायला त्रास होतो आहे. मी जाऊन नर्सला याचं कारण विचारलं, तर ती म्हणाली, हे काम स्पेशलाईज्ड नर्सेस बघत असतात. ते राऊंडला आले की ती त्यांना विचारेल. मी अस्वस्थ झाले आणि ह्या फ्लोअरची जबाबदारी ज्यांच्यावर आहे त्यांना कॉल केला. ते म्हणाले, हॉस्पिटलमधून त्या आज्जी डायरेक्ट संस्थेत दाखल झालेल्या आहेत आणि त्या फ्लोअरवर नवीन असल्याने त्यांचे सगळे डॉक्युमेंट्स, प्रिस्क्रिप्शन्स येणे, या सगळ्या प्रोसेसला जरा वेळ लागतो आहे. बाकीच्या लोकांसाठी ही सगळी रुटीन प्रोसेस असल्याने ते कॅज्युअल होते. ते त्यांचं त्यांचं काम रेग्युलर प्रोसेसनुसार करत होते, मात्र माझ्यासाठी हा अनुभव...

आज्जी-आजोबांची डायरी: भाग ३०

भाग २९ मध्ये लिहिले आहे, तिच्यासारखीच दुसरी पण जास्त सिनियर ताई, ही अतिशय गोड शब्दांचा बोलण्यात वापर करून मन सुखावून टाकत असते. सर्व सहकाऱ्यांना शाट्झी शाट्झी (इंग्रजीत अर्थ हनी, हनी) तर करतेच, पण आज्जी आजोबांसोबतही ह्याच भाषेत बोलत असते. आपण लाडाने कसं सोनूटली, बबडू वगैरे म्हणतो तसे जर्मनमध्ये प्रेमाच्या शब्दांना 'शन' असा प्रत्यय जोडतात. तर ती प्रत्येकाला प्रेमाने 'शन' जोडूनच संबोधते. उदा. आचाऱ्याला शेफ म्हणतात, तर ही संस्थेच्या आचाऱ्याला फोनवर माईन शेफशन(माझा शेफुला) असे संबोधून बोलते. संस्थेच्या नियमात हे असे बोलणे बसत नाही. आमच्या बॉसने मी जॉईन केले, तेंव्हाच मला सांगितलेले होते की असे बोलू नको बरंका कोणासोबत. थोडे अंतर ठेवून वागायचे आणि प्रोफेशनॅलिझम जपायचा, हेच तिलाही सांगितले होते, हे तिने मला सांगून, मला म्हणाली की मी हे असं सगळ्यांशी बोलते, हे तू प्लिज बॉसना सांगू नकोस हं.. मी अर्थातच हो म्हणाले. मला मुळात असं काही सांगायचं डोक्यातही आलं नव्हतं. आलं असतं तरी मी सांगितलं नसतं, कारण कुठली गोष्ट कळवणं गरजेचं आहे आणि कुठली नाही, याचं मला भान आहे. अर्थात मी नवीन...

आज्जी-आजोबांची डायरी: भाग २९

भाग २८ किळस न येऊ देता वाचून मायेने मला प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आणि खूप खूप आभार! ते प्रतिसाद वाचून माझ्या मनावरचे दडपण नष्ट होऊन मी एकदम रिलॅक्स झाले. आता यापुढे मी मोकळेपणाने जे आणि जसं घडलं, ते आणि तसं कुठल्याही आडपडद्याशिवाय लिहू शकेन. त्या 'आल्लं-माल्लं' असं बरळणाऱ्या आज्जींनी दुसऱ्या दिवशी अजूनच मजेशीर प्रकार केल्याचे दुसऱ्या नर्स ताईकडून कळले. ह्या आज्जी म्हणजे आपलं लहानसं गोड बाळच वाटल्या मला त्यांच्या बाळलीला ऐकून. अर्थात नर्स ताई ते सगळं ज्या स्वरात आणि भावात सांगत होती, त्यामुळेच.. ती म्हणे त्यांच्या रूममध्ये गेली, तेंव्हा आज्जी बाथरूममध्ये होत्या. कमोडमध्ये तळाशी असलेलं पाणी दोन्ही हातांच्या ओंजळीत घेऊन त्याने तोंड धुणे एन्जॉय करत बसलेल्या होत्या. त्यांना तिने सांगितलं, "आज्जी, अहो! हे पाणी तोंड धुण्यासाठी नाहीये. हे बेसिन बघा, इकडे तोंड धुवायचं असतं." मग नर्सने बघितलं, की कचऱ्याच्या डब्यात आज्जींनी शू करून ठेवलेली होती. तिने मग त्यांना हा कचऱ्याचा डबा त्यात कचरा फेकायचा असतो आणि शू कमोडवर बसून करायची असते, हे समजावून सांगितलं. ह्या ...

आज्जी-आजोबांची डायरी: भाग २८

आज फार दिवसांनी डायरी लिहिणे जमवू शकलेय.. बरेच अनुभव साठलेले आहेत.. कुठून सुरुवात करावी आणि काय आधी सांगावे आणि काय नंतर हे मला समजेनासे झालेले आहे. गेले काही दिवस वेळ मिळाला तसा चार पाच लांबलचक नोट्स लिहून आता हे नको, ते आधी घेऊ करत पब्लिश करणे कॅन्सल केले. शेवटी कोणीतरी कधीतरी सांगितलेले वाक्य 'सुरुवातीपासूनच सुरुवात करावी' हे आठवून पुन्हा लिहायला लागले. नशीब, ते आज पूर्ण करू शकले. हा भाग लिहिलेल्या नोट्सपेक्षा पूर्णपणे वेगळाच झालेला आहे, हे लिहून झाल्यावर लक्षात आले. गंमत म्हणजे सुरुवातीपासून सुरुवात केली खरी, पण लिहितांना मधूनच आठवले, ते लिहिले गेले. आजच्या भागात काही उल्लेख आहेत, ते काहीजणांना 'ग्रोस' वाटू शकतात. तर आजची डायरी वाचणे, टाळायचे असल्यास, ते जरूर करावे. सिनियर केअर होममधल्या माझ्या जॉबला मागच्या आठवड्यात 3 महिने तर क्वारंटाईन फ्लोअरवर माझी ड्युटी सुरू होऊन सव्वा महिन्याच्या वर झालाय आता. चौदा दिवसांचे पाहुणे असलेले अनेक आज्जी आजोबा वेगवेगळ्या दिवशी फ्लोअरवर आल्यामुळे रोज नवीन जण इकडे येत जात आहेत. त्यातील काहींसोबत फक्त ओळख, काहींसोबत मैत्री, तर क...

आज्जी आजोबांची डायरी: भाग २७

मागच्या आठवड्यात सिनियर केअर होमकडे जातांना लॉकडाऊन शिथिल केला गेला असल्याचं अचानकपणे जाणवलं.. करोनामुळे सुरू झालेल्या लॉकडाऊनमुळे एरव्ही शुकशुकाट असणाऱ्या जर्मनीच्या हॅनोवर शहरातील रस्त्यांवर आणि पब्लिक ट्रान्सपोर्टमध्येही लोकांची गर्दी आता पुन्हा दिसायला लागलेली आहे. लॉन असलेले गार्डन्स खुले झालेले असले तरी एकेका कुटुंबातील लहान मुलंच एकत्र खेळतांना दिसत आहेत. पब्लिक स्विमिंग पूल्स मात्र अजूनही बंदच आहेत. दरवर्षी ह्या स्विमिंगपुल्सवर तोबा गर्दी असते. पाय ठेवायला जागा नसते, इतके लोक तिथे येत असतात. जर्मनीत उन्हाळ्याची चाहूल लागताच लोक आऊटडोअर ऍक्टिव्हिटीजसाठी घराबाहेर पडतांना दिसतात. गार्डन्सच्या लॉन्सवर वाचत पडणे, पोहणे, जॉगिंग, खेळ, सायकल राईड, माउंटन क्लाइंबिंग, फॉरेस्ट वॉक, नॉर्डीक वॉक(दोन्ही हातांमध्ये स्टिक्स घेऊन चालणं) असं काही ना काही सुरू करतात. उन्हाचा पुरेपूर आस्वाद घेतात. हे सगळं लोक ह्या वर्षी लोक मोकळेपणाने करू शकतील की नाही?, हा उन्हाळा आऊटडोअर ऍक्टिव्हिटीजशिवायच संपून जाईल की काय? हा विचार मनात असतांनाच शिथिल केलेल्या लॉकडाऊनमुळे आशा पुन्हा पल्लवित झालेल्या आहेत...

आज्जी-आजोबांची डायरी: भाग २६

दोन आठवड्यापूर्वीची गोष्ट आहे. क्वारंटाईन फ्लोअरवर ड्युटी असल्याने बाकी कोणत्याही फ्लोअरवर जाण्याची गेले काही दिवस मला संधी मिळालेली नव्हती. ती मागच्या आठवड्यात चालून आली. एका केअर एम्प्लॉयी(स्पेशालाईज्ड नर्स) ने मला कॉल केला आणि सांगितले की एक आज्जी हॉस्पिटलमधून परत आलेल्या आहेत आणि त्यांना त्यांच्याच रूममध्ये क्वारंटाईन करण्यात आले आहे. (जे आज्जी आजोबा स्वतःहुन रूमबाहेर पडत नाहीत, त्यांना त्यांच्याच रूममध्ये आयसोलेट केले जाते.) ह्या आज्जी सारख्या रडत आहेत आणि त्यांची जगण्याची उमेद नष्ट झालेली आहे. तू त्यांना भेटशील का? मी अर्थातच होकार दिला. ह्या आज्जींना मी आधीही एकदा भेटलेले होते. तेंव्हाही अशीच कोणाच्यातरी सांगण्यावरूनच.. त्यांना तेंव्हाही असाच डिप्रेशनचा ऍटॅक आलेला होता. मी त्यांना पहिल्यांदा भेटले, तेंव्हा गप्पांच्या ओघात समजलं की त्यांनी लाईफ बुक लिहिलेलं आहे. मला त्यांनी ते उत्साहाने दाखवलं. ते हस्तलिखित पुस्तक त्यांच्या नातसुनेने टाईप करून, त्याच्या अनेक प्रिंट्स काढून, स्पायरल बाईंडीग करून कुटुंबातील सर्वांना त्याच्या कॉपीज वाटल्या असल्याची माहिती आज्जींनी मला दिली. त्या...

आज्जी-आजोबांची डायरी: भाग २५

सिनियर केअर होममधल्या माझ्या क्वारंटाईन फ्लोअरवरच्या ड्युटीमध्ये गेल्या आठवड्यापासून बरंच काही घडलं आहे.. बराच हॅपनिंग आहे हा फ्लोअर एकंदरीत.. मला सुरुवातीला अजिबात वाटलं नव्हतं की चार पाच आज्जी आजोबांना रोज भेटणे, हे इंटरेस्टिंग काम असेल. उलट मला वाटत होतं की वेळ खायला उठेल की काय, त्यांना मला रोज रोज बघून बोअर होईल की काय.. पण सुदैवाने झालंय उलटंच. त्या सतत नर्व्हस राहणाऱ्या आज्जींना थोडक्यात भेटून आणि दिलासा देऊन घरी आले, त्यानंतर दुसऱ्या दिवशी परत कामावर गेले, तर त्या अजूनही नर्व्हस स्थितीतच होत्या. एकतर त्यांच्यासाठी संस्थाही नवीन आणि वरून हे असलं आयसोलेशन, त्यामुळे त्यांची तब्येत अजूनच बिघडलेली. त्यांच्या रूममध्ये माझ्या सांगण्यावरून तातडीने रेडिओ पाठवलेला होता टेक्निशियनने, पण तो ऐकण्याच्या मनस्थितीतही त्या नव्हत्या. वाचायला दिलेलं वर्तमानपत्रही तसंच पडलेलं होतं टेबलवर. आता आज्जींचा नर्व्हसनेस वेगळ्या कारणावरून सुरू झालेला होता. त्यांच्या लेकीने त्यांना एक बेसिक मॉडेलचा फोन दिलेला होता, त्यात सगळे कॉन्टॅक्टस सेव्ह केलेले होते, पण त्यांना कळत नव्हतं की कॉल करायचा कसा? त्या...