Posts

आज्जी आजोबांची डायरी: भाग ४२

  डियर ऑल, " परवाचा स्ट्रेसफूल तरीही नोंदवायला हवा, असा दिवस आणि कालचा अनपेक्षित सुखद दिवस, असा मोठा भाग आज लिहिते आहे." असं कालच्या भागात लिहिलं आणि विचारांच्या गाडीने ट्रॅक बदलला. आज मात्र तसं होऊ देणार नाही. प्रॉमिस! मात्र स्ट्रेसफुल भाग मोठा झाल्याने अनपेक्षित सुखद भाग पुढच्या भागात लिहीन. परवा मी चौथ्या मजल्यावर ड्यूटीला होते. मागे एका भागात उल्लेख केलेला एक खेळ "मेन्श एर्गेरे दिश निष्त" काही आज्या तिथल्या सिटिंग कॉर्नरवर बसून खेळत होत्या. माझाही खेळण्याचा मूड झाला, म्हणून मी त्यांना जॉईन झाले. त्यातल्या एस के आज्जी खेळता खेळता एकदम सिरीयस दिसू लागल्या. काय झालं, विचारलं असता कॅथेटर लावलेले असल्याने क्रँम्प्स येत आहेत म्हणाल्या. हे नेहमीच होतं, असं त्या म्हणाल्या. त्यांचा एक पाय काही महिन्यांपूर्वी कुठल्यातरी आजारामुळे ऍम्प्युटेट करावा लागलेला होता. तेंव्हा हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांचे आता हे सिनियर केअर होम हेच घर झालेले आहे. त्यांची माझी ओळख तिसऱ्या मजल्यावरच्या एका डबल रूममध्ये झाली. ह्या नवीन आलेल्या फ्राऊ ( जर्मन भाषेत मिसेस ला फ्राऊ असे म्हण...

आज्जी आजोबांची डायरी: भाग ४१

  डायरी लिहायला सुरुवात करून एक वर्ष पूर्ण झालं, ह्यावर ६ एप्रिलला पोस्ट लिहिली आणि त्या वेळेपासूनच मन डायरी लेखनाकडे ओढ घेऊ लागलं होतंच आणि कालच अशा काही अजब, सुखद धक्के देणाऱ्या गोष्टी अनुभवायला मिळाल्या, ज्या सांगितल्यावर बहीण म्हणाली, "ताई प्लिज, लगेच हे लिहून काढ ना गं!" आईनेही त्याला दुजोरा दिला. मग आता हातातली सगळी कामं बाजूला ठेवून लिहायला सुरुवात केली. खरं म्हणजे लेकाला केजीत सोडून परतीच्या ट्रॅमच्या प्रवासात लिहायला सुरुवात केली. आज मी घरी आहे. ५ दिवसांचे वर्किंग अवर्स ४ दिवसात संपवून १ दिवस घर आवरणे, कपडे २/३ राऊंडसमध्ये (मशिनमध्ये) धुवून (ड्रायरमध्ये) वाळवून, घड्या घालून जागच्या जागी ठेवून देऊन, स्वयंपाक करून, केजीतून दमून भागून, भुकेजून घरी आलेल्या लेकाची काळजी घेणे, त्याने दप्तर फेकताक्षणी सुरू केलेल्या गोड बडबडीला नीट प्रतिसाद देणे- जिच्यात दिवसभराचा आढावा असतो, काय काय खेळले, शिकले, खाल्ले, शी केली की नाही, या सगळ्या डिटेल्समध्ये मी गढून जाते. थोडक्यात त्याला एंटरटेन करत करत स्वतः एंटरटेन्ड होणे, हे माझे आजचे अत्यंत आवडते रुटीन असते. ह्या दिवशी मला माझे पूर्णव...

आज्जी-आजोबांची डायरी: भाग ४०

माझ्या डायरीला आज एक वर्ष पूर्ण झालं पण! दिवस फारच पटापट पुढे सरकत आहेत.. जॉब सुरू होऊन मागच्या महिन्यात एक वर्ष पूर्ण झालं, तेंव्हाही असंच आश्चर्ययुक्त सुखद फिलिंग होतं. त्या दिवशी बॉस भेटल्या आणि त्यांनाही सांगितलं, की मला आज (११ मार्चला) इथे १ वर्ष पूर्ण झालं. त्यांनी 'हो ना गं! खरंच!' असं म्हणून मला (FFP2 मास्क दोघींनी लावलेला होता.) एकदम मिठीच मारली..  दुसऱ्या दिवशी मी ऑफिसला जातांना सगळ्या डिपार्टमेंट्ससाठी चॉकलेट्स घेऊन गेले आणि सर्वांना (जर्मन भाषेत) एक कॉमन इमेल लिहिली,  "डियर फ्रेंड्स अँड कलिग्ज, बघता बघता माझा जॉब सुरू झाला, त्याला एक वर्ष झालं पण! मला अजूनही तो दिवस आठवतो आहे, ज्या दिवशी माझी नोकरी पक्की झाली आणि मी कामाला सुरुवात केली.  मला मनातून भीती वाटत होती की मला हे काम जमेल का? सगळे मला accept करतील का? पण तुम्ही सर्वांनी मला प्रेमाने फक्त स्वीकारलंच नाही, तर माझ्या सर्व प्रश्नांची संयमाने उत्तरं दिली.  तुमच्यामुळेच मला ही नोकरी म्हणजे माझं दुसरं घरच वाटतं. तुमच्या प्रेमासाठी खूप खूप धन्यवाद. मी सोबत सर्व डिपार्टमेंट्स साठी चॉकलेट्स आणली आहेत, ती ...

आज्जी-आजोबांची डायरी: भाग ३९

डॉक्टरेट आजोबा आणि जर्मन लिटरेचरच्या लेक्चरर आज्जींची भलीमोठी गोष्ट आता कन्टीन्यू करते. आजोबा भेटून गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी मी परत या आज्जींना भेटले. त्या चांगल्या मूडमध्येच होत्या. त्या दिवशी आज्जींच्या हातात एक जर्मन पुस्तक होते. मला बघून अतिशय गोड हसून त्या म्हणाल्या, "तुमचे खूप खूप आभार! आता मला अजिबात एकटं आणि ऑड वाटत नाहीये." मग हातातलं पुस्तक दाखवत म्हणाल्या, "हे माझ्या बहिणीने मला पाठवलं आहे. ती दुसऱ्या गावी राहते. माझ्या वाचनाच्या आवडीबाबत तिला कल्पना आहे. आता माझ्याजवळ वेळच वेळ असल्याने तिने माझ्यासाठी हे पुस्तक आणि सोबत पत्रही पाठवलं आहे..." त्यानंतर मग आज्जींनी माझ्याशी थोडावेळ गप्पा मारल्या, ज्यात त्या दुसऱ्या आज्जीही अधूनमधून सहभागी होत होत्या, मात्र त्यांनी एकदाही त्यांच्या व्हीलचेअरची दिशा आमच्याकडे वळवली नाही. आपले आपले वाचन त्या करत राहिल्या. त्यानंतर साधारणपणे एक आठवडा मी ह्या दोन्ही आज्जींना भेटायला गेले नव्हते. याचे कारण म्हणजे मी ऑलरेडी त्यांना पुरेसा वेळ देऊन झालेला होता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या आता पुरत्या सावरलेल्या होत्या. त्य...

आज्जी-आजोबांची डायरी: भाग ३८

"कायदा" या क्षेत्रात डॉक्टरेट असलेले मात्र डिमेन्शिया म्हणजेच विस्मरणाचा आजार झाल्याने सिनियर केअर होममध्ये दाखल झालेले आजोबा करोना काळातील नियमानुसार क्वारंटाईन फ्लोअरवर दोन आठवडे राहून आणि भरपूर गोंधळ घालून संस्थेच्या तळमजल्यावर असलेल्या डिमेन्शिया वॉर्डमध्ये हलवले  गेले.  काही दिवसांनी त्यांच्या आडनावाशी साधर्म्य असलेल्या एक आज्जी संस्थेत दाखल झाल्याचे समजले. या त्यांच्या मिसेस तर नसतील ना? अशी शंका आली आणि तिचे निरसन करून घेतल्यावर समजले की माझी शंका बरोबरच होती आणि त्यामुळे मला अतिशय आनंद झाला होता. कारण ज्या आजोबांशी माझे इतके छान ऋणानुबंध निर्माण झालेले होते, त्यांच्याविषयी खरंतर मला काहीच माहिती नव्हती. एखाद्या पझलचे तुकडे जोडतांना योग्य तुकडा सापडल्यावर आणि जोडल्यावर चित्र पूर्ण झाले की आपल्याला जसा आनंद होतो, तसाच मला कायम एखाद्या व्यक्तीला आधीच ओळखत असतांना त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांना पाहिल्यावर होत असतो. मग ते त्यांचे जोडीदार असोत की मुलंबाळं, भावंडं असोत की इन-लॉ ज.. या संस्थेत नोकरी करायला सुरुवात केल्यापासून मला असे अनेक पझलचे तुकडे जोडतांना बघ...

आज्जी-आजोबांची डायरी- भाग ३७

  डायरी लिहिण्यात अधूनमधून गॅप होतच असतो, पण ह्यावेळेस जरा जास्तच गॅप पडला,हे खरंच.. सांगण्यासारख्या खूपच गोष्टी रोज घडत आहेत, पण ठरवूनही पूर्वीसारख्या लिहिल्या जात नाहीयेत. त्याला 'writer's block' असेही म्हणू शकत नाही, कारण लिहायला सुरुवात केली आणि सुचलेच नाही, असेही झालेले नाहीये. लिहायला बसण्यासाठी वेळ आणि मूड दोन्ही जुळून येणे ह्यावेळी काही ना काही कारणाने घडले नाही. असो.  डायरी नव्याने वाचायला सुरुवात करणाऱ्यांसाठी माहिती म्हणून सांगते. मी जर्मनीतील हॅनोवर शहरात एका सिनियर केअर होममध्ये रेसिडेंट सायकॉलॉजीस्ट म्हणून गेले साडेपाच महिने जॉब करते आहे आणि जॉईन केल्यानंतर 3 आठवड्यांनी डायरी लिहायला सुरुवात केली. आज डायरीचा भाग 37 लिहायला सुरुवात केली आहे. आता सगळे फ्लोअर्स क्वारंटाईन मुक्त स्वरूपातले असले, तरीही आज मी ज्यांची अतिशय नाट्यमय अशी गोष्ट सांगणार आहे, ते आजोबा मला क्वारंटाईन फ्लोअरवरच ओळखीचे झाले. हे आजोबा डॉ. असे प्रिफिक्स असलेले पहिलेच असल्याने ते मेडिकल डॉक्टर की डॉक्टरेट, हे जाणून घेण्याची मला उत्सुकता होती. त्यामुळे ते संस्थेत दाखल झाल्या झाल्या त्यांच्याशी...

आज्जी-आजोबांची डायरी: भाग ३६

मागच्या आठवड्याभरात बऱ्याच घडामोडी घडल्या. त्यातली एक सकारात्मक म्हणजे ज्या आज्जींची कोविड टेस्ट पॉझिटीव्ह आलेली होती, त्यांची नंतरची टेस्ट निगेटिव्ह आली. त्यांच्या संपर्कात आलेल्या रहिवाश्यांची आणि सर्व कर्मचाऱ्यांची टेस्टही निगेटिव्ह आली. तरीही त्या ज्या मजल्यावर राहत होत्या, तो मजला आयसोलेट करण्यात आला आणि ह्या आज्जी तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या इतर आज्जी आजोबांना चौथ्या मजल्यावर म्हणजेच जिथे मी गेले दोन महिने ड्यूटीला होते, तिथे शिफ्ट करण्यात आले आणि तो मजला पुन्हा एकदा आयसोलेट करण्यात आला. त्या मजल्यावर आत्तापर्यंत राहत असलेल्या आणि क्वारंटाईनमध्ये असलेल्या रहिवाश्यांना पहिल्या आणि तिसऱ्या मजल्यावर शिफ्ट करण्यात आले. त्यांनाही रूमबाहेर न पडण्याचे सांगण्यात आले होते. जेवणही रुममध्येच सर्व्ह केले जाणार, असे समजले असल्याने त्यातल्या सोशल नेचरच्या आज्जी आजोबांमध्ये पॅनिक परीस्थिती निर्माण झाली. १ जुलैला आजोबांच्या फ्युनरलाला जाऊन आलेल्या आज्जींची गोष्ट सांगितली आहेच, त्याच दिवशी सर्व आज्जी आजोबांना करोना परिस्थिती आणि दुपारच्या कॉफीब्रेकला सर्वांनी रूममध्येच थांबावे, असे...