आज्जी-आजोबांची डायरी: भाग ३१
डायरीच्या आजच्या भागात मी गैरसमज कसे निर्माण होऊ शकतात आणि सुसंवादाने प्रश्न कसे सुटू शकतात, ह्याचा मला आलेला एक अनुभव सांगणार आहे. मागच्या आठवड्यातली गोष्ट आहे. मी त्या दिवशी ड्युटी संपवून घरी गेले आणि क्वारंटाईन फ्लोअरवर एक नवीन आज्जी दाखल झाल्या. दुसऱ्या दिवशी माझ्या कामाच्या स्वरूपानुसार त्यांना भेटायला गेले, तेंव्हा त्यांनी सांगितले, त्यांना श्वासाचा आजार आहे आणि अजूनही त्यांचा पफ आणि औषधं पोहोचलेली नाहीत. त्यांना श्वास घ्यायला त्रास होतो आहे. मी जाऊन नर्सला याचं कारण विचारलं, तर ती म्हणाली, हे काम स्पेशलाईज्ड नर्सेस बघत असतात. ते राऊंडला आले की ती त्यांना विचारेल. मी अस्वस्थ झाले आणि ह्या फ्लोअरची जबाबदारी ज्यांच्यावर आहे त्यांना कॉल केला. ते म्हणाले, हॉस्पिटलमधून त्या आज्जी डायरेक्ट संस्थेत दाखल झालेल्या आहेत आणि त्या फ्लोअरवर नवीन असल्याने त्यांचे सगळे डॉक्युमेंट्स, प्रिस्क्रिप्शन्स येणे, या सगळ्या प्रोसेसला जरा वेळ लागतो आहे. बाकीच्या लोकांसाठी ही सगळी रुटीन प्रोसेस असल्याने ते कॅज्युअल होते. ते त्यांचं त्यांचं काम रेग्युलर प्रोसेसनुसार करत होते, मात्र माझ्यासाठी हा अनुभव