Posts

आज्जी-आजोबांची डायरी: भाग ३९

डॉक्टरेट आजोबा आणि जर्मन लिटरेचरच्या लेक्चरर आज्जींची भलीमोठी गोष्ट आता कन्टीन्यू करते. आजोबा भेटून गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी मी परत या आज्जींना भेटले. त्या चांगल्या मूडमध्येच होत्या. त्या दिवशी आज्जींच्या हातात एक जर्मन पुस्तक होते. मला बघून अतिशय गोड हसून त्या म्हणाल्या, "तुमचे खूप खूप आभार! आता मला अजिबात एकटं आणि ऑड वाटत नाहीये." मग हातातलं पुस्तक दाखवत म्हणाल्या, "हे माझ्या बहिणीने मला पाठवलं आहे. ती दुसऱ्या गावी राहते. माझ्या वाचनाच्या आवडीबाबत तिला कल्पना आहे. आता माझ्याजवळ वेळच वेळ असल्याने तिने माझ्यासाठी हे पुस्तक आणि सोबत पत्रही पाठवलं आहे..." त्यानंतर मग आज्जींनी माझ्याशी थोडावेळ गप्पा मारल्या, ज्यात त्या दुसऱ्या आज्जीही अधूनमधून सहभागी होत होत्या, मात्र त्यांनी एकदाही त्यांच्या व्हीलचेअरची दिशा आमच्याकडे वळवली नाही. आपले आपले वाचन त्या करत राहिल्या. त्यानंतर साधारणपणे एक आठवडा मी ह्या दोन्ही आज्जींना भेटायला गेले नव्हते. याचे कारण म्हणजे मी ऑलरेडी त्यांना पुरेसा वेळ देऊन झालेला होता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या आता पुरत्या सावरलेल्या होत्या. त्य...

आज्जी-आजोबांची डायरी: भाग ३८

"कायदा" या क्षेत्रात डॉक्टरेट असलेले मात्र डिमेन्शिया म्हणजेच विस्मरणाचा आजार झाल्याने सिनियर केअर होममध्ये दाखल झालेले आजोबा करोना काळातील नियमानुसार क्वारंटाईन फ्लोअरवर दोन आठवडे राहून आणि भरपूर गोंधळ घालून संस्थेच्या तळमजल्यावर असलेल्या डिमेन्शिया वॉर्डमध्ये हलवले  गेले.  काही दिवसांनी त्यांच्या आडनावाशी साधर्म्य असलेल्या एक आज्जी संस्थेत दाखल झाल्याचे समजले. या त्यांच्या मिसेस तर नसतील ना? अशी शंका आली आणि तिचे निरसन करून घेतल्यावर समजले की माझी शंका बरोबरच होती आणि त्यामुळे मला अतिशय आनंद झाला होता. कारण ज्या आजोबांशी माझे इतके छान ऋणानुबंध निर्माण झालेले होते, त्यांच्याविषयी खरंतर मला काहीच माहिती नव्हती. एखाद्या पझलचे तुकडे जोडतांना योग्य तुकडा सापडल्यावर आणि जोडल्यावर चित्र पूर्ण झाले की आपल्याला जसा आनंद होतो, तसाच मला कायम एखाद्या व्यक्तीला आधीच ओळखत असतांना त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांना पाहिल्यावर होत असतो. मग ते त्यांचे जोडीदार असोत की मुलंबाळं, भावंडं असोत की इन-लॉ ज.. या संस्थेत नोकरी करायला सुरुवात केल्यापासून मला असे अनेक पझलचे तुकडे जोडतांना बघ...

आज्जी-आजोबांची डायरी- भाग ३७

  डायरी लिहिण्यात अधूनमधून गॅप होतच असतो, पण ह्यावेळेस जरा जास्तच गॅप पडला,हे खरंच.. सांगण्यासारख्या खूपच गोष्टी रोज घडत आहेत, पण ठरवूनही पूर्वीसारख्या लिहिल्या जात नाहीयेत. त्याला 'writer's block' असेही म्हणू शकत नाही, कारण लिहायला सुरुवात केली आणि सुचलेच नाही, असेही झालेले नाहीये. लिहायला बसण्यासाठी वेळ आणि मूड दोन्ही जुळून येणे ह्यावेळी काही ना काही कारणाने घडले नाही. असो.  डायरी नव्याने वाचायला सुरुवात करणाऱ्यांसाठी माहिती म्हणून सांगते. मी जर्मनीतील हॅनोवर शहरात एका सिनियर केअर होममध्ये रेसिडेंट सायकॉलॉजीस्ट म्हणून गेले साडेपाच महिने जॉब करते आहे आणि जॉईन केल्यानंतर 3 आठवड्यांनी डायरी लिहायला सुरुवात केली. आज डायरीचा भाग 37 लिहायला सुरुवात केली आहे. आता सगळे फ्लोअर्स क्वारंटाईन मुक्त स्वरूपातले असले, तरीही आज मी ज्यांची अतिशय नाट्यमय अशी गोष्ट सांगणार आहे, ते आजोबा मला क्वारंटाईन फ्लोअरवरच ओळखीचे झाले. हे आजोबा डॉ. असे प्रिफिक्स असलेले पहिलेच असल्याने ते मेडिकल डॉक्टर की डॉक्टरेट, हे जाणून घेण्याची मला उत्सुकता होती. त्यामुळे ते संस्थेत दाखल झाल्या झाल्या त्यांच्याशी...

आज्जी-आजोबांची डायरी: भाग ३६

मागच्या आठवड्याभरात बऱ्याच घडामोडी घडल्या. त्यातली एक सकारात्मक म्हणजे ज्या आज्जींची कोविड टेस्ट पॉझिटीव्ह आलेली होती, त्यांची नंतरची टेस्ट निगेटिव्ह आली. त्यांच्या संपर्कात आलेल्या रहिवाश्यांची आणि सर्व कर्मचाऱ्यांची टेस्टही निगेटिव्ह आली. तरीही त्या ज्या मजल्यावर राहत होत्या, तो मजला आयसोलेट करण्यात आला आणि ह्या आज्जी तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या इतर आज्जी आजोबांना चौथ्या मजल्यावर म्हणजेच जिथे मी गेले दोन महिने ड्यूटीला होते, तिथे शिफ्ट करण्यात आले आणि तो मजला पुन्हा एकदा आयसोलेट करण्यात आला. त्या मजल्यावर आत्तापर्यंत राहत असलेल्या आणि क्वारंटाईनमध्ये असलेल्या रहिवाश्यांना पहिल्या आणि तिसऱ्या मजल्यावर शिफ्ट करण्यात आले. त्यांनाही रूमबाहेर न पडण्याचे सांगण्यात आले होते. जेवणही रुममध्येच सर्व्ह केले जाणार, असे समजले असल्याने त्यातल्या सोशल नेचरच्या आज्जी आजोबांमध्ये पॅनिक परीस्थिती निर्माण झाली. १ जुलैला आजोबांच्या फ्युनरलाला जाऊन आलेल्या आज्जींची गोष्ट सांगितली आहेच, त्याच दिवशी सर्व आज्जी आजोबांना करोना परिस्थिती आणि दुपारच्या कॉफीब्रेकला सर्वांनी रूममध्येच थांबावे, असे...

आज्जी-आजोबांची डायरी: भाग ३५

मी खालच्या मजल्यावरच्या ऑफिसमध्ये कॉम्प्युटरवर डॉक्युमेंट करत बसलेले असतांनाच मला कॉल आला, एका आज्जींना मिस्टरांच्या फ्युनरलला जायचे नाहीये, त्या खूप रडत आहेत, तू प्लिज त्यांना जाऊन भेटशील का लगेच? फ्युनरलला जायचे नाहीये? असे कसे होऊ शकते? आज्जींनी आजोबा गेले, हे अजूनही स्वीकारले नाहीये का? असे प्रश्न मनात असतांनाच मन दोन आठवडे मागे भूतकाळात गेले.. माझ्यासोबत अगदी जवळून संपर्क आल्यानंतर काही तासांतच निधन पावलेल्या एकूण तीन व्यक्तींपैकी हे आजोबाही एक. सगळ्यात पहिल्या होत्या, त्या आज्जी नं 1 , ज्यांचा मृत्यू पचवणे मला फार अवघड गेले होते, तो किस्सा मी मागे लिहिला होता. मग क्वारंटाईन फ्लोअरवरच्या आज्जी, ज्यांचा किस्सा मी भाग ३३ मध्ये लिहिलेला आहे, त्या मुळातच बेडरिडन असल्याने अपेक्षित असले, तरी इतक्या लवकर कसे, म्हणून दुःख तर झालेच होते. आणि आता हे आजोबा.. ह्यांचा किस्सा प्रचंड वेदनादायी होता माझ्यासाठी. दोन आठवड्यापूर्वी मी क्वारंटाईन फ्लोअरवर ड्यूटी करत असतांना मला कॉल आला. एक आजोबा आज्जी जोडपं एकमेकांसोबत फार भांडत असून आजोबा आज्जींचं फारच डोकं खात असतात आणि आज्जींना त्याचा फार त...

आज्जी-आजोबांची डायरी: भाग ३४

आयुष्य म्हणजे 'सापशिडीचा' खेळ किंवा जर्मन भाषेत 'मेन्श एर्गेरे दिश निष्त' हा खेळ तर नाही ना, असे वाटावे, इतक्या पटापट घडामोडी होऊन गोष्टी क्षणात होत्याच्या नव्हत्या होऊन पुन्हा शून्यापासून सुरू कराव्या लागत आहेत. करोनाने आयुष्याचा आपल्याजवळ काहीही कंट्रोल नाही, आपण प्लॅन करायचा आणि ह्या करोनाबाबाने उधळून लावायचा, असा जणू चंगच बांधलेला आहे, असे आता वाटायला लागलेय आणि हे दुष्टचक्र कधी संपेल, संपेल की नाही, असे निराशाजनक विचार मनात निर्माण होत आहेत, पण ते झटकून इतर निराश लोकांना सावरण्याची जबाबदारी निभावतांना आता माझ्या मात्र नाकी नऊ यायला लागलेले आहेत.. मागच्या भागात लिहिल्याप्रमाणे १ जुलैपासून क्वारंटाईन फ्लोअर बंद करून त्याचे नॉर्मल फ्लोअरमध्ये रूपांतर करायला २९ जून पासूनच सुरुवात झाली. सगळे आयसोलेटेड पार्टीशन्स काढून टाकण्यात आले, बाकी फ्लोअर्सवर ड्यूटी करणाऱ्यांना साधे मास्कस होते, तर आम्हाला FFP2 मास्कस वापरावे लागत होते, ते बंद करून नॉर्मल मास्कस देण्यात आले. मी प्रोटेक्शनचा लवाजमा असलेला ड्रेस घालणे बंद करून माझ्या नेहमीच्या कपड्यांमध्ये वावरायला लागले. सगळ...

आज्जी-आजोबांची डायरी: भाग ३३

२६.०६.२०२० रोजी लिहिलेली डायरी नीट लिहून प्रकाशित करायचे काही ना काही कारणाने राहून गेले. हे लिहून झाल्यानंतर आता बरेच काही घडलेले आहे, पण हे वाचल्याशिवाय पुढचा संदर्भ लागणार नाही, म्हणून आधी हे २ भागात प्रकाशित करते आहे. (भाग:२) जगभरात काही देशांमध्ये करोना परिस्थिती सुधारते आहे, तर काही देशांमध्ये ती चिघळत चाललेली आहे, मात्र सगळीकडेच आता करोनासोबत जगायला सुरुवात करण्याविषयी एकवाक्यता व्हायला लागलेली असल्याने लॉकडाऊन शिथिल करत अनलॉकच्या फेजेस सुरू होतांना दिसत आहेत. जर्मनीमध्येही आता रेस्टॉरंटस आणि तिथे सुरू झालेली वर्दळही दिसायला लागलेली आहे. हॅनोवर शहरात गेले काही महिने ट्रॅमचा प्रवास सुरु असतांना तिकीट चेकर दिसला नव्हता, त्याची मागच्या आठवड्यात एक चक्कर माझ्या ट्रॅममध्ये होऊन गेली. मी जॉब करत असलेल्या सिनिअर केअर होममध्ये मार्चच्या उत्तरार्धात सुरुवातीला व्हिजिटर्सना पूर्णपणे बंदी, मग फक्त मरणासन्न अवस्थेतील आज्जी आजोबांना भेटायला परवानगी, तीही एकावेळी फक्त एकाला, अशी, मग गार्डनमध्ये एका फॅमिलीतील फक्त एक किंवा दोन जण पार्टीशन असलेल्या तंबूत सुरक्षित अंतरावरून भेटणे आणि मग...