Posts

Showing posts from March, 2024

आमची लंडन ट्रिप

आमची लंडन ट्रिप शनिवार दि. 16 मार्च ते बुधवार दि. 20 मार्च असे प्रवास धरून एकूण पाच दिवसांची लंडन ट्रिप आम्ही केली. खूप दिवसांपासून मनात असलेली ही ट्रिप फायनली प्रत्यक्षात करता आली. भारतात राहत असतांना इंग्रजी ही आंतरराष्ट्रीय भाषा आहे, हे ऐकतच मोठे झालेलो असतो आपण. मात्र युरोपियन देशांमध्ये आलो की हा समज साफ खोटा ठरावा, असे अनुभव येतात, जे अर्थातच मलाही आले. जर्मनीत राहायला लागले आणि इथे इंग्रजी चालत नाही, हे कळले. इतरही युरोपियन देशांमध्ये कमी अधिक प्रमाणात हीच परिस्थिती असल्याचं लक्षात आलं. इंग्रजी येत असूनही समोरच्याला त्यांची भाषा बोलायला प्रवृत्त करून त्यांच्या भाषेचं जतन करण्याचं महत्वाचं काम हे देश करतात. त्यांचं म्हणणं असतं की इंग्लिश लोक शिकतात का तुमची भाषा? ते तुम्हालाच इंग्रजी शिकून बोलायला लावतात ना? मग आम्हीही तेच करतो! ह्या पार्श्वभूमीवर लंडन ट्रिप करायचं ठरवलं आणि सगळ्यात पहिली गोष्ट मनात आली, ती म्हणजे जिथे आपल्याला व्यवस्थित समजते, बोलता येते, ती भाषा असलेल्या देशात आपण जात आहोत आणि या गोष्टीचे प्रचंड थ्रील मनात होते. शिवाय ज्या ब्रिटिशांनी आपल्यावर राज्य केले, त्य