आज्जी आजोबांची डायरी: भाग ४२
डियर ऑल, " परवाचा स्ट्रेसफूल तरीही नोंदवायला हवा, असा दिवस आणि कालचा अनपेक्षित सुखद दिवस, असा मोठा भाग आज लिहिते आहे." असं कालच्या भागात लिहिलं आणि विचारांच्या गाडीने ट्रॅक बदलला. आज मात्र तसं होऊ देणार नाही. प्रॉमिस! मात्र स्ट्रेसफुल भाग मोठा झाल्याने अनपेक्षित सुखद भाग पुढच्या भागात लिहीन. परवा मी चौथ्या मजल्यावर ड्यूटीला होते. मागे एका भागात उल्लेख केलेला एक खेळ "मेन्श एर्गेरे दिश निष्त" काही आज्या तिथल्या सिटिंग कॉर्नरवर बसून खेळत होत्या. माझाही खेळण्याचा मूड झाला, म्हणून मी त्यांना जॉईन झाले. त्यातल्या एस के आज्जी खेळता खेळता एकदम सिरीयस दिसू लागल्या. काय झालं, विचारलं असता कॅथेटर लावलेले असल्याने क्रँम्प्स येत आहेत म्हणाल्या. हे नेहमीच होतं, असं त्या म्हणाल्या. त्यांचा एक पाय काही महिन्यांपूर्वी कुठल्यातरी आजारामुळे ऍम्प्युटेट करावा लागलेला होता. तेंव्हा हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांचे आता हे सिनियर केअर होम हेच घर झालेले आहे. त्यांची माझी ओळख तिसऱ्या मजल्यावरच्या एका डबल रूममध्ये झाली. ह्या नवीन आलेल्या फ्राऊ ( जर्मन भाषेत मिसेस ला फ्राऊ असे म्हण