Posts

Showing posts from September, 2020

आज्जी-आजोबांची डायरी: भाग ३९

डॉक्टरेट आजोबा आणि जर्मन लिटरेचरच्या लेक्चरर आज्जींची भलीमोठी गोष्ट आता कन्टीन्यू करते. आजोबा भेटून गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी मी परत या आज्जींना भेटले. त्या चांगल्या मूडमध्येच होत्या. त्या दिवशी आज्जींच्या हातात एक जर्मन पुस्तक होते. मला बघून अतिशय गोड हसून त्या म्हणाल्या, "तुमचे खूप खूप आभार! आता मला अजिबात एकटं आणि ऑड वाटत नाहीये." मग हातातलं पुस्तक दाखवत म्हणाल्या, "हे माझ्या बहिणीने मला पाठवलं आहे. ती दुसऱ्या गावी राहते. माझ्या वाचनाच्या आवडीबाबत तिला कल्पना आहे. आता माझ्याजवळ वेळच वेळ असल्याने तिने माझ्यासाठी हे पुस्तक आणि सोबत पत्रही पाठवलं आहे..." त्यानंतर मग आज्जींनी माझ्याशी थोडावेळ गप्पा मारल्या, ज्यात त्या दुसऱ्या आज्जीही अधूनमधून सहभागी होत होत्या, मात्र त्यांनी एकदाही त्यांच्या व्हीलचेअरची दिशा आमच्याकडे वळवली नाही. आपले आपले वाचन त्या करत राहिल्या. त्यानंतर साधारणपणे एक आठवडा मी ह्या दोन्ही आज्जींना भेटायला गेले नव्हते. याचे कारण म्हणजे मी ऑलरेडी त्यांना पुरेसा वेळ देऊन झालेला होता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या आता पुरत्या सावरलेल्या होत्या. त्य

आज्जी-आजोबांची डायरी: भाग ३८

"कायदा" या क्षेत्रात डॉक्टरेट असलेले मात्र डिमेन्शिया म्हणजेच विस्मरणाचा आजार झाल्याने सिनियर केअर होममध्ये दाखल झालेले आजोबा करोना काळातील नियमानुसार क्वारंटाईन फ्लोअरवर दोन आठवडे राहून आणि भरपूर गोंधळ घालून संस्थेच्या तळमजल्यावर असलेल्या डिमेन्शिया वॉर्डमध्ये हलवले  गेले.  काही दिवसांनी त्यांच्या आडनावाशी साधर्म्य असलेल्या एक आज्जी संस्थेत दाखल झाल्याचे समजले. या त्यांच्या मिसेस तर नसतील ना? अशी शंका आली आणि तिचे निरसन करून घेतल्यावर समजले की माझी शंका बरोबरच होती आणि त्यामुळे मला अतिशय आनंद झाला होता. कारण ज्या आजोबांशी माझे इतके छान ऋणानुबंध निर्माण झालेले होते, त्यांच्याविषयी खरंतर मला काहीच माहिती नव्हती. एखाद्या पझलचे तुकडे जोडतांना योग्य तुकडा सापडल्यावर आणि जोडल्यावर चित्र पूर्ण झाले की आपल्याला जसा आनंद होतो, तसाच मला कायम एखाद्या व्यक्तीला आधीच ओळखत असतांना त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांना पाहिल्यावर होत असतो. मग ते त्यांचे जोडीदार असोत की मुलंबाळं, भावंडं असोत की इन-लॉ ज.. या संस्थेत नोकरी करायला सुरुवात केल्यापासून मला असे अनेक पझलचे तुकडे जोडतांना बघता आले आह

आज्जी-आजोबांची डायरी- भाग ३७

  डायरी लिहिण्यात अधूनमधून गॅप होतच असतो, पण ह्यावेळेस जरा जास्तच गॅप पडला,हे खरंच.. सांगण्यासारख्या खूपच गोष्टी रोज घडत आहेत, पण ठरवूनही पूर्वीसारख्या लिहिल्या जात नाहीयेत. त्याला 'writer's block' असेही म्हणू शकत नाही, कारण लिहायला सुरुवात केली आणि सुचलेच नाही, असेही झालेले नाहीये. लिहायला बसण्यासाठी वेळ आणि मूड दोन्ही जुळून येणे ह्यावेळी काही ना काही कारणाने घडले नाही. असो.  डायरी नव्याने वाचायला सुरुवात करणाऱ्यांसाठी माहिती म्हणून सांगते. मी जर्मनीतील हॅनोवर शहरात एका सिनियर केअर होममध्ये रेसिडेंट सायकॉलॉजीस्ट म्हणून गेले साडेपाच महिने जॉब करते आहे आणि जॉईन केल्यानंतर 3 आठवड्यांनी डायरी लिहायला सुरुवात केली. आज डायरीचा भाग 37 लिहायला सुरुवात केली आहे. आता सगळे फ्लोअर्स क्वारंटाईन मुक्त स्वरूपातले असले, तरीही आज मी ज्यांची अतिशय नाट्यमय अशी गोष्ट सांगणार आहे, ते आजोबा मला क्वारंटाईन फ्लोअरवरच ओळखीचे झाले. हे आजोबा डॉ. असे प्रिफिक्स असलेले पहिलेच असल्याने ते मेडिकल डॉक्टर की डॉक्टरेट, हे जाणून घेण्याची मला उत्सुकता होती. त्यामुळे ते संस्थेत दाखल झाल्या झाल्या त्यांच्याशी