आज्जी आजोबांची डायरी: भाग ४३
जगात काहीही होवो, मात्र काहीजण जणूकाही अमरपट्टा घेऊनच जन्माला आले आहेत, असंच वाटत असतं आपल्याला. त्यामुळे त्यांच्या मृत्यूचा धक्का खूपच जोरात बसतो आणि तो पचवायला अवघड जाते.. त्यातल्याच एक म्हणजे हाई. आज्जी.. (खरे नाव माहिती संरक्षण नियमानुसार सांगता येत नसल्याने इनिशिअल्सने संबोधले आहे.) ह्या हाई. आज्जी म्हणजेच बाहुलीवाल्या आज्जी. त्यांचा उल्लेख मी मागे डायरीच्या एका भागात केलेला आहे. ज्या परवा हे जग सोडून अचानकपणे निघून गेल्या. पावणेदोन वर्षांपूर्वी माझ्या डायरीच्या १७व्या भागात मी ह्या आज्जींचे वर्णन केले होते, ते असे: **************************************** आयसोलेटेड रूम्समध्ये गेल्याने भीतीदायक फीलिंग आल्याचे दोन किस्से तर सांगून झालेले आहेतच, आज नॉन आयसोलेटेड रूममधल्या एका आज्जींची गोष्ट सांगते, ज्यांच्या रुममध्ये जाताच मला भीती वाटली, कारण त्यांच्या रूमचा दरवाजा उघडताच मला दिसल्या बाहुल्याच बाहुल्या! लहानपणापासून पाहिलेल्या सिनेमांमधून अशा बाहुल्यांचे कनेक्शन ब्लॅक मॅजिकशी जोडले गेलेले पाहिल्याने साहजिकच भीती वाटली. कारण त्यांच्या रूममध्ये शिरताच दाराजवळच्या कॉर्नरला हॅर