Posts

Showing posts from July, 2020

आज्जी-आजोबांची डायरी: भाग ३६

मागच्या आठवड्याभरात बऱ्याच घडामोडी घडल्या. त्यातली एक सकारात्मक म्हणजे ज्या आज्जींची कोविड टेस्ट पॉझिटीव्ह आलेली होती, त्यांची नंतरची टेस्ट निगेटिव्ह आली. त्यांच्या संपर्कात आलेल्या रहिवाश्यांची आणि सर्व कर्मचाऱ्यांची टेस्टही निगेटिव्ह आली. तरीही त्या ज्या मजल्यावर राहत होत्या, तो मजला आयसोलेट करण्यात आला आणि ह्या आज्जी तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या इतर आज्जी आजोबांना चौथ्या मजल्यावर म्हणजेच जिथे मी गेले दोन महिने ड्यूटीला होते, तिथे शिफ्ट करण्यात आले आणि तो मजला पुन्हा एकदा आयसोलेट करण्यात आला. त्या मजल्यावर आत्तापर्यंत राहत असलेल्या आणि क्वारंटाईनमध्ये असलेल्या रहिवाश्यांना पहिल्या आणि तिसऱ्या मजल्यावर शिफ्ट करण्यात आले. त्यांनाही रूमबाहेर न पडण्याचे सांगण्यात आले होते. जेवणही रुममध्येच सर्व्ह केले जाणार, असे समजले असल्याने त्यातल्या सोशल नेचरच्या आज्जी आजोबांमध्ये पॅनिक परीस्थिती निर्माण झाली. १ जुलैला आजोबांच्या फ्युनरलाला जाऊन आलेल्या आज्जींची गोष्ट सांगितली आहेच, त्याच दिवशी सर्व आज्जी आजोबांना करोना परिस्थिती आणि दुपारच्या कॉफीब्रेकला सर्वांनी रूममध्येच थांबावे, असे

आज्जी-आजोबांची डायरी: भाग ३५

मी खालच्या मजल्यावरच्या ऑफिसमध्ये कॉम्प्युटरवर डॉक्युमेंट करत बसलेले असतांनाच मला कॉल आला, एका आज्जींना मिस्टरांच्या फ्युनरलला जायचे नाहीये, त्या खूप रडत आहेत, तू प्लिज त्यांना जाऊन भेटशील का लगेच? फ्युनरलला जायचे नाहीये? असे कसे होऊ शकते? आज्जींनी आजोबा गेले, हे अजूनही स्वीकारले नाहीये का? असे प्रश्न मनात असतांनाच मन दोन आठवडे मागे भूतकाळात गेले.. माझ्यासोबत अगदी जवळून संपर्क आल्यानंतर काही तासांतच निधन पावलेल्या एकूण तीन व्यक्तींपैकी हे आजोबाही एक. सगळ्यात पहिल्या होत्या, त्या आज्जी नं 1 , ज्यांचा मृत्यू पचवणे मला फार अवघड गेले होते, तो किस्सा मी मागे लिहिला होता. मग क्वारंटाईन फ्लोअरवरच्या आज्जी, ज्यांचा किस्सा मी भाग ३३ मध्ये लिहिलेला आहे, त्या मुळातच बेडरिडन असल्याने अपेक्षित असले, तरी इतक्या लवकर कसे, म्हणून दुःख तर झालेच होते. आणि आता हे आजोबा.. ह्यांचा किस्सा प्रचंड वेदनादायी होता माझ्यासाठी. दोन आठवड्यापूर्वी मी क्वारंटाईन फ्लोअरवर ड्यूटी करत असतांना मला कॉल आला. एक आजोबा आज्जी जोडपं एकमेकांसोबत फार भांडत असून आजोबा आज्जींचं फारच डोकं खात असतात आणि आज्जींना त्याचा फार त

आज्जी-आजोबांची डायरी: भाग ३४

आयुष्य म्हणजे 'सापशिडीचा' खेळ किंवा जर्मन भाषेत 'मेन्श एर्गेरे दिश निष्त' हा खेळ तर नाही ना, असे वाटावे, इतक्या पटापट घडामोडी होऊन गोष्टी क्षणात होत्याच्या नव्हत्या होऊन पुन्हा शून्यापासून सुरू कराव्या लागत आहेत. करोनाने आयुष्याचा आपल्याजवळ काहीही कंट्रोल नाही, आपण प्लॅन करायचा आणि ह्या करोनाबाबाने उधळून लावायचा, असा जणू चंगच बांधलेला आहे, असे आता वाटायला लागलेय आणि हे दुष्टचक्र कधी संपेल, संपेल की नाही, असे निराशाजनक विचार मनात निर्माण होत आहेत, पण ते झटकून इतर निराश लोकांना सावरण्याची जबाबदारी निभावतांना आता माझ्या मात्र नाकी नऊ यायला लागलेले आहेत.. मागच्या भागात लिहिल्याप्रमाणे १ जुलैपासून क्वारंटाईन फ्लोअर बंद करून त्याचे नॉर्मल फ्लोअरमध्ये रूपांतर करायला २९ जून पासूनच सुरुवात झाली. सगळे आयसोलेटेड पार्टीशन्स काढून टाकण्यात आले, बाकी फ्लोअर्सवर ड्यूटी करणाऱ्यांना साधे मास्कस होते, तर आम्हाला FFP2 मास्कस वापरावे लागत होते, ते बंद करून नॉर्मल मास्कस देण्यात आले. मी प्रोटेक्शनचा लवाजमा असलेला ड्रेस घालणे बंद करून माझ्या नेहमीच्या कपड्यांमध्ये वावरायला लागले. सगळ

आज्जी-आजोबांची डायरी: भाग ३३

२६.०६.२०२० रोजी लिहिलेली डायरी नीट लिहून प्रकाशित करायचे काही ना काही कारणाने राहून गेले. हे लिहून झाल्यानंतर आता बरेच काही घडलेले आहे, पण हे वाचल्याशिवाय पुढचा संदर्भ लागणार नाही, म्हणून आधी हे २ भागात प्रकाशित करते आहे. (भाग:२) जगभरात काही देशांमध्ये करोना परिस्थिती सुधारते आहे, तर काही देशांमध्ये ती चिघळत चाललेली आहे, मात्र सगळीकडेच आता करोनासोबत जगायला सुरुवात करण्याविषयी एकवाक्यता व्हायला लागलेली असल्याने लॉकडाऊन शिथिल करत अनलॉकच्या फेजेस सुरू होतांना दिसत आहेत. जर्मनीमध्येही आता रेस्टॉरंटस आणि तिथे सुरू झालेली वर्दळही दिसायला लागलेली आहे. हॅनोवर शहरात गेले काही महिने ट्रॅमचा प्रवास सुरु असतांना तिकीट चेकर दिसला नव्हता, त्याची मागच्या आठवड्यात एक चक्कर माझ्या ट्रॅममध्ये होऊन गेली. मी जॉब करत असलेल्या सिनिअर केअर होममध्ये मार्चच्या उत्तरार्धात सुरुवातीला व्हिजिटर्सना पूर्णपणे बंदी, मग फक्त मरणासन्न अवस्थेतील आज्जी आजोबांना भेटायला परवानगी, तीही एकावेळी फक्त एकाला, अशी, मग गार्डनमध्ये एका फॅमिलीतील फक्त एक किंवा दोन जण पार्टीशन असलेल्या तंबूत सुरक्षित अंतरावरून भेटणे आणि मग

आज्जी-आजोबांची डायरी: भाग ३२

२६.०६.२०२० या दिवशी विस्कळीतपणे लिहिलेला हा मोठा भाग नीट लिहून नंतर प्रकाशित करावा, म्हणता म्हणता तो प्रकाशित करायचा राहूनच गेला. हा भाग खूप मोठा झाल्याने दोन भागात विभागून टाकत आहे. (भाग:१) डायरीच्या या भागात मी क्वारंटाईन फ्लोअरवर ड्युटीच्या निमित्ताने बराच काळ राहता आल्याने काय काय नवीन शिकता आले आणि अनुभवता आले, त्यातला काही भाग सांगणार आहे. मुळातच माझ्यासाठी एकंदरीतच हा जॉब नवीन असल्याने बऱ्याच जणांच्या कामाचे स्वरूप नक्की काय आहे, हे मला माहिती नव्हते, ते ह्या फ्लोअरवर आल्यामुळे मला समजू शकले. जसे नर्स आणि स्पेशलाईज्ड नर्स, यांच्यातला फरक.. बॉस, ऍडमिन स्टाफ, रिसेप्शन आणि मी सोडून बाकी सर्व स्टाफला युनिफॉर्म आहे. टेक्निकल स्टाफ, वॉशिंग, क्लिनिंग, किचन, ऑक्युपेशनल थेरपिस्ट, नर्सेस या सर्वांना युनिफॉर्म आहेत. नर्सेसचे दोन प्रकार आहेत आणि त्या दोघांनाही वेगवेगळे युनिफॉर्म्स आहेत. नर्सिंगचा कोर्स एक वर्षाचा तर स्पेशलाईज्ड नर्सिंगचा तीन वर्षाचा, असा तो फरक. नर्सचे काम आज्जी आजोबांच्या वेगवेगळ्या टेस्टस घेणे, त्यांना वेळच्यावेळी औषधे देणे, त्यांची रूम लावणे, त्यांना गरज असल्यास